मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र यावेळी अभिनेत्री तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जान्हवीने सांगितलं की, ती 10 वर्षांची असताना तिने पहिल्यांदा तिचा मॉर्फ केलेला फोटो पाहिला. तिचा फोटो पापाराझींनी क्लिक केल्याचं अभिनेत्रीने सांगितलं. मात्र, नंतर कोणीतरी त्या फोटोशी छेडछाड करून त्या फोटोमध्ये बदल केला आहे. जान्हवीने सांगितलं की, तिने हा फोटो याहूच्या होमपेजवर पाहिला होता. न्यूजलॉन्ड्रीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान जान्हवीने सांगितलं की, तिचा हा मॉर्फ केलेले फोटो पहिल्यांदाच अश्लील वेबसाइट्सवर पाहून तिला धक्का बसला. या फोटोसाठी शाळेत तिची खूप खिल्ली उडवली गेली.
या विषयी बोलताना जान्हवी म्हणाली, 'कॅमेरा हा नेहमीच माझ्या आयुष्याचा भाग राहिला आहे. आमच्या लहानपणी आम्ही जेव्हा कधी बाहेर जायचो तेव्हा आमच्या परवानगीशिवाय लोकं आमचे फोटो काढू लागले. माझा एक फोटो पहिल्यांदा व्हायरल झाला तेव्हा मी 10 वर्षांची होतो. जेव्हा मी माझ्या शाळेच्या प्रयोगशाळेत पोहोचले, तेव्हा माझ्या क्लासमेटच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर माझे पापाराझींनी क्लिक केलेल हे फोटो दिसत होते.
मात्र या फोटोंना खूप विचित्र मॉर्फ केलं गेलं होतं. हे फोटो खूपच विचित्र होते. मेकअपशिवाय फोटोंसोबतच जान्हवीला फिल्म इंडस्ट्रीत लॉन्च करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्या फोटोंमुळे मला लोकप्रियता मिळाली नाही, पण शाळेतील सगळ्या मुलांनी नक्कीच माझी चेष्टा केली. कालांतराने सगळे मला नापसंत करू लागले. त्यावेळी माझ्यासोबत काय होतंय ते मला समजत नव्हतं. माझ्या मित्रांनी माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली.
आजच्या तंत्रज्ञान आणि एआयच्या युगात फोटोंशी छेडछाड करण्याचं प्रमाण वाढलं आहे. जेव्हा लोकं हे मॉर्फ केलेले फोटो पाहतात तेव्हा ते सत्य म्हणून स्वीकारतात. मला या प्रकरणाची खूप काळजी वाटते. जान्हवी पुढे म्हणाली, 'मला लहानपणापासून अनेक लोकांचे टोमणे ऐकावे लागले आहेत. अगदी लहान वयात मी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला तेव्हा लोकांनी यावरही प्रश्न उपस्थित केले.
'माझ्या शिक्षकांनीही नंतर माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. माझ्या आजूबाजूला असे अनेक लोकं होते ज्यांनी सांगितलं की, मी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी असल्याने मला काम करण्याची गरज नाही. यामुळे मला अनेकदा खूप टोमणेही ऐकावे लागले. मात्र, त्या वयात मला या गोष्टी समजत नव्हत्या.