close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

PHOTO : नव्या पाहुण्यासाठी जय- माही उत्सुक

पोस्ट केला आणखी एक सुरेख फोटो...

Updated: May 30, 2019, 01:21 PM IST
PHOTO : नव्या पाहुण्यासाठी जय- माही उत्सुक

मुंबई : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता जय भानुशाली आणि त्याची पत्नी माही विज यांच्या कुटंबात लवकरच एका नवीन पाहुण्याचं आगमन होणार आहे. माही पुन्हा एकदा आई होणार असून सोशल मीडियावर त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. जय भानुशालीने एक फोटो शेअर केला असून त्याला कॅप्शन देत त्याने सर्वांना ही 'गुड न्यूज' दिली आहे. 

जयने इन्स्टाग्रामवर माहीसोबतचा आणि त्याच्या मुलासोबतचा कोलाज केलला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जय आणि त्याचा मुलगा माहीच्या बेबी बंम्पसह दिसत आहेत. जयने या फोटोला 'आम्ही अतिशय आनंदी आहोत, नवीन पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी आणि हा पाहुणा मुलगा आहे की मुलगी हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.' असं कॅप्शन त्याने दिलं आहे. तुम्हाला काय वाटतं?' असा सवालही त्याने चाहत्यांना केला आहे.

माहीनेही जयसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तिनेदेखील या फोटोला एक सुंदर कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमधून तिने तिच्या आई होण्याचा आनंद व्यक्त केला आहे.

जय आणि माहीला याआधी एक मुलगा आणि एक मुलगी आहे. जय आणि माहीने या मुलांना दत्तक घेतल्याचं बोललं जातं. आता पुन्हा एकदा चिमुकल्याच्या आगमनाने दोघांनी आनंद व्यक्त केला आहे.