सिनेमाच्या प्रमोशनसाठी काहीही..रणवीर सिंगने पाहा 'हे' काय केलं?

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या आगामी जयेशभाई जोरदार या सिनेमामुळे चर्चेत आहे. मे महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

Updated: Apr 25, 2022, 03:59 PM IST
सिनेमाच्या प्रमोशनसाठी काहीही..रणवीर सिंगने पाहा 'हे' काय केलं? title=

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या आगामी जयेशभाई जोरदार या सिनेमामुळे चर्चेत आहे. मे महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी रणवीर ठिकठिकाणी भेटी देत आहे. 

जयेशभाई जोरदार या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना पसंतीस पडला आहे. सिनेमातून चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या सिनेमाचं प्रमोशन करतेवेळी रणवीरचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. नेहमीप्रमाणे अतरंगी कपडे घालत रणवीरने लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

 फुलांची प्रिंट असलेला शर्ट, मल्टिकलर पायजमा आणि त्यावर पिवळे शूज असा पेहराव केल्याने रणवीर सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल होत आहे. इतकंच काय पण रणवीरने अजब-गजब डान्स केला जो पाहून आजूबाजूचे लोक हैराण झाले आहेत.

'जयेशभाई जोरदार' हा सिनेमा 13मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्त्री भ्रूण हत्येवर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात रणवीरसोबत अभिनेत्री शालिनी पांडे मुख्य भूमिकेत आहे.