'वागले की दुनिया' मालिकेच्या सेटवर फुटला कोरोना बॉम्ब, 8 लोक कोरोनाच्या विळख्यात

कोरोना पॉझिटिव्ह कलाकार आणि कर्मचारी होम क्वारांटाईन आहेत

Updated: Apr 7, 2021, 09:28 PM IST
 'वागले की दुनिया' मालिकेच्या सेटवर फुटला कोरोना बॉम्ब, 8 लोक कोरोनाच्या विळख्यात

मुंबई : देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज कोट्यवधी लोक या विषाणूच्या विळख्यात अडकत आहेत. कोरोनाची वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता मनोरंजन क्षेत्रासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. निर्मात्यांनी आठवड्याच्या शेवटी शुटिंग करण्यास बंदी घातली आहे, तसंच कमी लोकांमध्ये शूट पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. जेडी मजीठियाचा शो 'वागले की दुनिया'च्या सेटवर 8 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

सुमित राघवनच्या 'वागले की दुनिया' या शोची निर्मिती जेडी मजीठिया करत आहेत. या शोच्या सेटवर 8 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात कलाकार आणि कर्मचारी दोघांचाही समावेश आहे. सर्व कोरोना पॉझिटिव्ह कलाकार आणि कर्मचारी होम क्वारांटाईन आहेत. सेटवर स्वच्छता करून, सॅनिटायझेशन करुन शूटिंगला पुन्हा सुरूवात करण्यात आली आहे.

सेटवर बरेच लोक कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेकजण चकीत झाल्याचे निर्माते जेडी मजीठिया यांनी सांगितलं आहे. प्रत्येकजण याबद्दल काहीही बोलण्यास घाबरत आहे. मजीठियाच्या शोमधील तंत्रज्ञांपैकी एकाचं कोरोना व्हायरसमुळे निधन झालं आहे.

32 वर्षानंतर हा कार्यक्रम परत आला आहे
32 वर्षांनंतर लेखक आर के लक्ष्मण 'वागले की दुनिया'चा सुपरहिट शो परत आणण्यात आला आहे. हा कार्यक्रम दूरदर्शनवर 1988-1990 या काळात प्रसारित झाला होता. 32 वर्षांनंतर वागळे यांचा मुलगा राजू या मालिकेत मोठा झाला असून या नव्या मालिकेत राजूची व्यक्तिरेखा सुमित राघवन साकारत आहे.

हा शो जेडी मजीठिया यांना जवळ आहे
वागळे कि दुनिया हा शो निर्माते जेडी मजीठिया यांच्या जवळचा आहे. एकेकाळी जेव्हा त्यांच्या घरी टीव्ही नव्हता, तेव्हा ते हा शो शेजार्‍यांच्या घरी जाऊन बघायचे. त्या दिवसांच्या आठवणींना ताजेतवाने करणारे जेडी म्हणाले की, ३३ वर्षांपूर्वी आपण निर्माता होणार याची मी कल्पनाही केली नव्हती. जिथे ते हाच शो त्यांच्या शेजाऱ्यांच्या घरी जाऊन पहायचे, तेथे याच शोची आपण निर्मीती करु याची त्यांना स्वप्नातदेखील कल्पना न्हवती.