World Health Dayच्या दिवशी विद्या बालनने दिला असा संदेश, प्रत्येकाचं बोलणं होईल बंद ! गांधींच्या तीन माकडांच्या शैलीत फोटो शेअर करुन दिला हा धडा

वजनामुळे बर्‍याचदा ट्रोल होणाऱ्या विद्या बालनने नेहमीच टीका सकारात्मकतेने घेतली आहे आणि अभिनयाच्या माध्यमातून तिने नेहमीच स्वत: ला सर्वोत्कृष्ट असल्याचे सिद्ध केलं आहे

Updated: Apr 7, 2021, 09:23 PM IST
 World Health Dayच्या दिवशी विद्या बालनने दिला असा संदेश, प्रत्येकाचं बोलणं होईल बंद ! गांधींच्या तीन माकडांच्या शैलीत फोटो शेअर करुन दिला हा धडा

मुंबई : बॉलिवूडची बिग बालन आणि करोडो हृद्यांची सुलू, लाखो लोकांना प्रेरणा देणारी आहे, विद्या कायमच तिच्या सिनेमातून संदेश देत असते. विद्या तिच्या अभिनयामधून चाहत्यांची मने जिंकते. कामगिरीबद्दल टीका असो वा विद्याच्या वाढत्या वजनावर  झालेली टिका असो. प्रत्येक मुद्यावर विद्या आपल्या विचारांना कसं प्रेमाने हाताळते हे आपण तिच्याकडूनच शिकलं पाहिजे.
आपल्या वजनामुळे बर्‍याचदा ट्रोल होणाऱ्या विद्याने नेहमीच ही टीका सकारात्मकतेने घेतली आहे आणि अभिनयाच्या माध्यमातून तिने नेहमीच स्वत: ला सर्वोत्कृष्ट असल्याचे सिद्ध केलं आहे आणि म्हणूनच विद्याचं वजन तिच्या अभिनयाच्या मार्गावर कधी आड आलेलं नाही.

जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी, सोशल मीडियावर, ती आपल्या चाहत्यांना प्रेमाचा संदेश देत आहे, या व्हिडिओमध्ये विद्या गांधीजींच्या तीन माकडांबद्दल माहिती देताना दिसत आहे, ती आपल्या फोटोंद्वारे सांगत आहे की, "लोक माझ्या आजू - बाजूला पहातात आणि मला सांगतात की, तुमचं वजन तुमच्या आरोग्याचा भाग असावा तुमची ओळख नाही.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

असा संदेश देत विद्याने ट्रोल करणाऱ्या त्या लोकांची प्रेमळपणानं बोलती बंद केली. जी लोक, विद्याच्या अभिनयापेक्षा विद्याच्या वजनाचा जास्त विचार करतात. बिनधास्तपणे आपलं वक्तव्य सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर चाहते विद्याचं कौतुक करत आहेत.

विद्याच्या शकुंतला या चित्रपटातील अभिनयाचं सर्व स्तरावरुन भरभरुन कौतुक झालं होतं. विद्या लवकरच 'शेरनी' या चित्रपटामध्ये दिसणार आहे, जिथे ती वनविभागाच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत मनुष्य आणि पशू यांच्यातील चकमकीचे निराकरण अत्यंत हुशारीने व स्थिरतेने करताना दिसणार आहे.