मुंबई : बऱ्याचवेळा सेलिब्रिटी त्यांच्या कामा व्यतिरिक्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. काहीवेळा तर त्यांचे काही खासगी फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहतो. दरम्यान, जगप्रसिद्ध अभिनेत्री-गायिका जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) चे हनिमूनचे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत.
जेनिफर ही नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते. ५२ वर्षीय जेनिफर गेल्या काही वर्षांपासून सुप्रसिद्ध अभिनेता बेन अफ्लेकसोबत (Ben Affleck) रिलेशनशिपमध्ये होती. 16 जुलै रोजी त्या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्या दिवशी जेनिफर-बेन विवाहबंधनात अडकले. अमेरिका येथील Las Vegas मध्ये या दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. जेनिफरचा वेडिंग लूकमधील व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असताना, आता तिचे हनीमुनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
जेनिफर लोपेझ आणि बेन पॅरिसमधील एका रेस्टॉरंटमध्ये स्पॉट झाले होते. दोघेही एकमेकांना किस करताना दिसले होते. दोघांचे काही फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर लीक झाले असून ते व्हायरल होत आहेत. यावेळी जेनिफर लोपेझने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर बेन ऍफ्लेकने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दोघेही किस करताना दिसत आहेत.
बेन आणि जेनिफर लोपेझने 16 जुलै रोजी Las Vegas मधील लिटल व्हाईट वेडिंग चॅपलमध्ये लग्न केलं. त्यांनी 3 महिने आधीच त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा केली. जेनिफरनं एका पत्राद्वारे तिच्या लग्नाची घोषणा केली. जेनिफर आणि बेन यांची 2003 मध्ये एंगेजमेंट झाली होती. यानंतर मात्र, दोघांनी लग्न केलं नाही आणि त्यांचं नातं संपुष्टात आल होतं.
जेनिफर आणि बेन यांना एकूण 5 मुलं आहेत. ही सर्व मुलं त्यांच्या पहिल्या लग्नातील आहेत. जेनिफर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. ती सोशल मीडियावर तिचे अनेक बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. बेन हा एक हॉलिवूड अभिनेता आहे.