'हा' अभिनेता दुसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात, फोटो आले समोर

पाच मुलांच्या आईसोबत लग्न, दुसऱ्यांदा लग्न करणारा हा अभिनेता आहे तरी कोण? 

Updated: Aug 21, 2022, 08:21 PM IST
'हा' अभिनेता दुसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात, फोटो आले समोर  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये संध्या नवीन कपल्सच्या लग्नाच्या आणि प्रेग्नेन्सीच्या चर्चांनी जोर धरलाय. अनेक अभिनेते आणि अभिनेत्री लग्नबंधनात अडकण्याच्या चर्चा असताना आता एका अभिनेत्याने लग्न केल्याची चर्चा रंगलीय. या अभिनेत्याने दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. त्यामुळे त्याच्या या लग्नाची चर्चा रंगलीय. दरम्यान हा अभिनेता आहे कोण व त्याने कोणत्या प्रसिद्ध महिलेसोबत लग्न केलंय ते जाणून घेऊयात.  

बॉलिवूडमध्ये लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच तिकडे हॉलिवूड कपलं जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) आणि बेन ऍफ्लेक (Ben Affleck) यांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. हे प्रसिद्ध कपल दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकल आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.  

गेल्या महिन्यात लास वेगासमध्ये गायिका जेनिफर लोपेझ आणि हॉलिवूड अभिनेता बेन ऍफ्लेक यांनी लग्न केले होते. या लग्नात ते एका सुंदरशा वेडींग कपलमध्ये दिसले होते. या लग्नानंतर आता पुन्हा एकदा ते दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले आहेत. बेन आणि जेनिफरच्या दुसऱ्या लग्नाचे खूप सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बेन आणि जेनिफरच्या या लग्नात या जोडप्याची पाच मुलं मॅक्स, एमी, व्हायोलेट, सरफिनिया आणि सॅम्युअल देखील उपस्थित होते. तसेच दोघांच्या लग्नाच्या या सेलिब्रेशनमध्ये अनेक हॉलिवूड स्टार्स उपस्थित होते.