पैश्यांकरता लग्नांमध्ये नाचणाऱ्यांपैकी मी नाही

सलमान खानवर साधला निशाणा 

पैश्यांकरता लग्नांमध्ये नाचणाऱ्यांपैकी मी नाही

मुंबई : जॉन अब्राहम हा Highest Paid Actor असून तो आपल्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच मनोरंजन करत असतो. 'सत्यमेव जयते' या सिनेमाला मिळालेल्या भरघोस यशानंतर आता तो 'बाटला हाऊस' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 

जॉन अब्राहमने नाव न घेता मोठ्या कलाकारांवर निशाणा साधला आहे.  पैश्यांकरता मी कोणत्याही लग्नात किंवा डान्स शोमध्ये नाचणाऱ्यापैंकी नाही असं म्हणत अभिनेता जॉन अब्राहमने सलमान खानला सुनावलं आहे. 

जॉनने एका मुलाखतीत सांगितलं की, 'मला हे कळत नाही की, कलाकारांनी सर्वाधिक कमाई करणाऱ्या लोकांच्या यादीत सहभागी होणं का गरजेचं आहे?' आपण कलाकार आहोत. आपली ओळख ही कामाने होते. अनेक कलाकार हे हायएस्ट पेड सेलेब्सच्या यादीत सतत 3 वर्षे कसे असू शकतात? कारण त्यांचे सिनेमे खूप वाईट पद्धतीने आपटलेले असतात. 

जॉनने या मुलाखतीत सरळ सलमानवर निशाणा साधला आहे. तो म्हणतो की,'2018 ची हायएस्ट पेड सेलेब्सची यादी पाहा. यामध्ये सलमान खानचं नाव टॉपवर आहे. पण त्याचा रेस 3 हा सिनेमा आपटला.'

तसेच तो म्हणाला की, 'अनेक सितारे एअरपोर्टवर फनी आऊटफीट घालून जातात. आणि मग म्हणतात, आम्ही ट्रोल झालो. पण जे काही घातलं आहे ते तुमच्याच आवडीचं आहे.'

'मी लग्नात अजिबात नाचू शकत नाही. मी हे म्हणत नाही की, असं करणं चुकीचं आहे. पण मी असं कधीच करू शकत नाही', असं म्हणतं त्याने इशा अंबानीच्या लग्नात नाचणाऱ्या कलाकारांसंबंधी बोलला आहे.