मुंबई : ‘करोना अब तेरा रोना शुरू हो जाएगा.. भागेगा तू करोना.. मांगेगा ना पानी.. इंडिया मे जो घुसनेकी तू कर बैठा नादानी’ अशा प्रकारे बॉलिवूडचा विनोदवीर जॉनी लिव्हरने कोरोना विरोधात एक कविता सोशल मीडियावर सादर केली आहे. सध्या ही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या देशात लॉकडाऊनचा काळ सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्यात असलेल्या कौशल्याच्या माध्यमातून जनतेला घरी बसून कोरोनावर मात करण्याचा सल्ला देत आहेत.
आपण घरात बसल्यामुळे कोरोना आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तो घाबरून पळून जाईल आणि आपण कोरोना विरूद्ध युद्ध जिंकू असं जॉनी लिव्हर सांगत आहेत. ‘हम हिंदुस्तानी’ या गाण्याच्या चालीवर त्यांनी करोनाचं गाणं म्हटलंय.
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडल आहे. आतापर्यंत राज्यात १५७४ लोकांना कोरोनाची लागणी झाली आहे. तर ११० कोरोनाबाधित रूग्णांचा बळी गेला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. मुंबईत १००८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर यामध्ये ६४ लोकांचा बळी गेला आहे.