जूनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटाने बनवला नवीन रेकॉर्ड, जो आजपर्यंत कोणत्याही अभिनेत्याने केला नाही

जूनियर एनटीआरचा 'देवरा' चित्रपट 27 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर चित्रपटाने आतापासूनच जोरदार वातावरण तयार केलं आहे. अशातच आता या चित्रपटाने एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. जाणून घ्या सविस्तर 

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 24, 2024, 12:55 PM IST
जूनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटाने बनवला नवीन रेकॉर्ड, जो आजपर्यंत कोणत्याही अभिनेत्याने केला नाही title=

Devara : जूनियर एनटीआरचा 'देवरा' चित्रपट 27 सप्टेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते देखील प्रचंड उत्सुक झाले आहेत. अशातच आता या चित्रपटाने परदेशात प्री- बुकिंगमध्ये नवीन  रेकॉर्ड केला आहे. ज्याचे आकडे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. 'RRR'नंतर जूनियर एनटीआरला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

जूनियर एनटीआरचा 'देवरा' चित्रपट रिलीज होण्यासाठी अवघे 3 दिवस उरले आहेत. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाबाबत वातावरण तयार झाले आहे. आता चाहते फक्त चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये जान्हवी कपूर जूनियर एनटीआरसोबत काम करत आहे. त्याचबरोबर अभिनेता सैफ अली खान देखील या चित्रपटात आहे. भारतात देखील या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहेत.

मात्र, परदेशात 'देवरा' चित्रपटाच्या प्री-बुकिंगमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जूनियर एनटीआरने एक मोठा विक्रम केला आहे. जूनियर एनटीआर हा पहिला भारतीय अभिनेता बनला आहे. ज्याच्या चित्रपटाने प्री-सेल्समध्ये $2 मिलियनचा टप्पा ओलांडला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

जूनियर एनटीआरचा सर्वात मोठा विक्रम

जूनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते देखील प्रचंड उत्सुक झाले आहेत. या चित्रपटात तो दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. अमेरिकेत काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. अशातच आता निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर करून मोठी माहिती दिली आहे. 

'देवरा' हा चित्रपट 300 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. अमेरिकेत या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला मिळालेला प्रतिसाद पाहून निर्माते देखील खूप उत्साहित झाले आहेत. पहिल्याच दिवशी हा चित्रपट जबरदस्त कमाई करणार असल्याचे देखील बोलले जात आहे. जूनियर एनटीआरचा या वर्षाचा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. सध्या संपूर्ण टीम या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे.