'पतीसोबत मतभेद, म्हणून घटस्फोट...' पहिल्यांदाच Divorce विषयी इतक्या स्पष्टपणे बोलल्या आशाताई

Relationship News : नेमकं काय चुकतंय? आशा भोसले घटस्फोटाच्या मुद्द्यावरून इतक्या चिंतेत का? पाहा....कलाविश्व आणि अध्यात्मातील संवादातून नेमकं हाती काय लागलं...  

सायली पाटील | Updated: Sep 24, 2024, 12:45 PM IST
'पतीसोबत मतभेद, म्हणून घटस्फोट...' पहिल्यांदाच Divorce विषयी इतक्या स्पष्टपणे बोलल्या आशाताई title=
veteran singer Asha Bhosle on Increasing Divorce In Young Generation know what she said

Relationship News : हल्ली नातेसंबंध कितीही वेगानं आकारास येत असले तरीही ते नातेसंबंध टिकवणं तितकंच आव्हानात्मक असल्याचीच बाब एकंदर चित्र पाहता लक्षात येते. त्यातच मागील काही वर्षांमध्ये तरुणाईमध्ये तरुण जोडप्यांमध्ये वाढतं घटस्फोटाचं प्रमाणही चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीसुद्धा तरुण पिढीपुढं असणारी भावनात्मक आव्हानं पाहता वाढत्या घटस्फोटांबाबत चिंता व्यक्त केली आहे. 

नुकतंच आध्यात्मिक गुरू रविशंकर यांच्याशी संवाद साधताना त्यांनी याविषयीची चिंता स्पष्टपणे मांडत या परिस्थीतीमागची नेमकी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. शिवाय तरुण जोडप्यांमध्ये असणारं प्रेम इतक्या कमी वेळातच संपुष्ठात येण्याविषयीसुद्धा त्यांनी चिंतेचा सूर आळवला. आपल्यालाही पतीसोबत्या नात्यात काही अडचणींचा सामना करावा लागला होता. पण नातं तोडण्याइतकं कठोर पाऊल कधी उचललं नाही असं त्यांनी या संवादादरम्यान सांगितलं.

'पतीसोबत माझेही मतभेद होते. पण, मी कधी पतीला घटस्फोट दिला नाही. हल्ली तर मी दर महिन्याला घटस्फोटाचे कागदपत्र पाठवणाऱ्या जोडप्यांविषयी ऐकते. असं का होतंय?' असं आशा भोसले म्हणाल्या. याचसंदर्भात कलाविश्वातील अनुभवाची जोड देत त्या म्हणाल्या, 'मी या कलाजगतामध्ये कैक वर्षे काम केलं आहे. अनेक लोकांना भेटले आहे पण, आधी ते अठी कठोर पावलं उचलत नव्हते जसं आजची पिढी करतेय. मला असं वाटतंय की त्यांच्यात असणारं प्रेम फार लवकर कमी होतंय ज्यामुळं ते एकमेकांसमवेत फार कमी वेळातच कंटाळत आहेत. हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं.'

हेसुद्धा वाचा : Swiggy Zomato जेवण मागवल्यास एक पदार्थ किती महाग? आकडा पाहून म्हणाल, ही खिसा रिकामा करायची कामं

 

रविशंकर यांनी आशाताईंचे प्रश्न पाहून काय उत्तर दिलं? 

रविशंकर यांनी वरील गोष्टी आणि मुद्दे लक्षात घेत दिलेल्या उत्तरानुसार हल्ली आकर्षण प्रेमापेक्षाही वरचढ ठरतं. इतकंच नव्हे तर तरुण जोडप्यांमध्ये सहनशीलता तुलनेनं कमी आहे, ज्यामुळं समस्या कधीच कमी होत नाहीत, हा विचार मांडताना तुमच्यावर ईश्वरीय विश्वासही होता आणि संकटं झेलण्याची, त्यांच्यावर मात करण्याची ताकदही होती अशा शब्दांत आशाताईंच्या प्रश्नांची उत्तरं दिली.