Jug Jugg Jeeyo: ट्रेलर लॉन्चवेळी करण जौहरने केलं असं कृत्य, पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्या 'जुग जुग जिओ' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे.

Updated: May 22, 2022, 07:29 PM IST
Jug Jugg Jeeyo: ट्रेलर लॉन्चवेळी करण जौहरने केलं असं कृत्य, पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल title=

मुंबई : वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्या 'जुग जुग जिओ' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि नीतू कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता ट्रेलर लॉन्च इव्हेंटचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो खूप मजेदार आहे.

असं कृत्य करण जोहरने सगळ्यांसमोर केलं
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अनिल कपूर आणि करण जोहर मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अनिल कपूर स्टेजवर पोहोचताच करण जोहर त्याच्या पायांना स्पर्श करण्यासाठी खाली वाकतो. तेव्हाच अनिल कपूर उडी मारून मागे उभा राहतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनिल कपूरची रिएक्सशन
अनिल कपूरने हातवारे करत करण जोहरला पाय स्पर्श करण्यास नकार दिला. यानंतर करण जोहर आणि अनिल कपूर एकमेकांना मिठी मारून हसतात. 'जुग जुग जिओ'च्या ट्रेलर लॉन्चदरम्यानचा हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे. हे पाहून तुम्हालाही हसू येईल. आता करण जोहर आणि अनिल कपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.