'कॉम्प्रोमाईज केल्याशिवाय...', वयाच्या 17 व्या वर्षी जुही परमारकडे चॅनेल हेडने केलेली 'ती' मागणी

Juhi Parmar : जुही परमारनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला आलेल्या या अनुभवाविषयी खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 26, 2024, 10:42 AM IST
'कॉम्प्रोमाईज केल्याशिवाय...', वयाच्या 17 व्या वर्षी जुही परमारकडे चॅनेल हेडने केलेली 'ती' मागणी title=
(Photo Credit : Social Media)

Juhi Parmar : छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस 5' विजेती आणि 'कुमकुम एक प्यारा सा बंधन' या मालिकेत दिसलेली अभिनेत्री जुही परमार आता एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. जुहीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कास्टिंग काउचवर वक्तव्य केलं आहे. जुहीनं यावेळी सांगितलं की तिला एका शूटसाठी टू-पीस बिकिनी घाल असं सांगितलं आणि त्यानं तिचं करिअर खूप उंचावर जाईल असं सांगितलं. आता तिनं सांगितलेल्या संपूर्ण प्रकरणामुळे सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. 

'बिग बॉस 5' मध्ये गेल्यानंतर जुहीला खूप लोकप्रियता मिळाली. Hautterflyला दिलेल्या मुलाखतीत, जुही परमारनं कास्टिंग काउचा सामना करण्याविषयी सांगितलं. जुहीनं सांगितलं की जेव्हा ती साडे सतरा वर्षांची होती. तेव्हा एका चॅनल हेडनं एक म्यूजिक एल्बम शूट करण्यासाठी संपर्क केला होता. तिथे जुहीला बिकीनी परिधान करायची होती. जुहीनं हिंम्मत करुन त्या ऑफरला नकार दिला. त्यानंतर चॅनल हेडनं तिच्या तत्त्वांना आव्हान देत तिला विचारले की तिला विश्वास आहे की ती तडजोड न करता इंडस्ट्रीत टिकून राहू शकते. तो म्हणाला, 'या शब्दाला कॉम्प्रोमाइज म्हणतात, हे केले नाही तर इथे तुला टिकून राहता येईल, असं वाटतं का?'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

जुहीनं पुढे सांगितलं की जर तिला तिच्या सिद्धांतावर राहुन चांगल्या भूमिका मिळाल्या नाही तर तिला घरी परतायला आवडेल. याच विश्वासानं जुही त्या ऑफिसमधून घरी परतली. त्याच्या जवळपास दोन वर्षानंतर जुही 'शाहीन' आणि 'चूडिया' सारख्या मालिकांमध्ये काम करु लागली. तेव्हा तिनं एक सेकेंड-हैंड मारुति 800 गाडी खरेदी केली. एक दिवस गाडी चालवत असताना तिनं त्याचं चॅनल हेडला तिच्या ऑफिसच्या बाहेर उभं असल्याचं पाहिलं. जुहीनं लगेच तिच्या गाडीची काच खाली केली आणि म्हणाली 'सर, मी कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि तरीही मी योग्य प्रकारे सर्व्हाइव करते आणि ही गाडी मी माझ्या पैशांनी घेतली आहे.' 

हेही वाचा : 'जरा तरी लाज वाटू दे', अभिनेत्रीने केली विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पतीची पोलखोल

जुही परमारच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिला अनेक लोक आजही कुमकुम या भूमिकेसाठी ओळखतात. जुहीनं 'कुमकुम- एक प्यारा सा बंधन', 'चूडियां' आणि 'शाहीन' सारख्या मालिकांमध्ये दिसली. त्याशिवाय ती 'बिग बॉस 5' विजेती देखील ठरली होती. तर काही दिवसांपूर्वी जुही ही 'ये मेरी फॅमिली' मध्ये दिसली होती.