या प्रसिद्ध गायकाचा व्हिडिओ युट्युबवर सर्वाधिक लोकांनी केला डिसलाईक

गूगलप्रमाणेच कोणत्याही गोष्टीचे उत्तर शोधण्यासाठी आजकाल युट्युबर सर्च केला जातो.

Updated: Oct 18, 2017, 04:27 PM IST
या प्रसिद्ध गायकाचा व्हिडिओ युट्युबवर सर्वाधिक लोकांनी केला डिसलाईक  title=

मुंबई : गूगलप्रमाणेच कोणत्याही गोष्टीचे उत्तर शोधण्यासाठी आजकाल युट्युबर सर्च केला जातो.

एखादी गोष्ट कशी करावी इथपासून ते सिनेमाचे ट्रेलर किंवा पूर्ण चित्रपट युट्युब पाहिला जातो. उत्पन्नाचं साधन म्हणूनही पाहिल्या जाणार्‍या युट्युबवर कोणता व्हिडिओ सगळ्यात जास्त नाकारला गेला आहे ? हे तुम्हांला ठाऊक आहे का ? 

जस्टीन बिबरचे 'बेबी' हे गाणं खूप गाजलं. परंतू युट्युबवर या गाण्याचा व्हिडिओ अधिक लोकांनी डिसलाईक केलेला आहे.

जस्टीन बीबरचे हे गाणे १७२ करोड जणांनी पाहिले आहे. त्यापैकी ७० लाखांहून अधिकांनी या गाण्याचा व्हिडिओ लाईक केला आहे.  पण  ८० लाखांहून अधिकांनी याच व्हिडिओला अनलाईक केले आहे. 

 

'बेबी' गाण्यानंतर या यादीत रेबेका ब्लॅक यांचे ‘फ्रायडे’हे गाणं दुसऱ्या क्रमांकावर आहे. ६ लाख ७० हजार लोकांनी हे गाणे लाईक केले आहे. त्यापैकी  २५ लाख ७९ हजार जणांनी या गाण्याचा व्हिडिओ डिसलाईक केला आहे.  

युट्युबच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडिओच्या यादीमध्ये गंगनम स्टाईल हे गाणं सुमारे साडेचार वर्ष अव्वल स्थानी होते. मात्र आता हे गाणं दुसर्‍या क्रमांकावर आहे.