close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'काहे दिया परदेस'फेम अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं निधन

बुधवारी पहाटे झोपेतच शुभांगी जोशी यांचं निधन झालं

'काहे दिया परदेस'फेम अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं निधन

मुंबई : बुधवारी सकाळीच एक दु:खद बातमी समोर आलीय. ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं निधन झालंय. 'झी मराठी' या चॅनेलवरील लोकप्रिय ठरलेल्या 'काहे दिया परदेस' या मालिकेत त्यांनी निभावलेली आजीची भूमिका प्रचंड गाजली होती. 

बुधवारी पहाटे झोपेतच शुभांगी जोशी यांचं निधन झाल्याचं समोर येतंय. मृत्यूसमयी शुभांगी जोशी 72 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई आणि तीन नातवंडे असा परिवार आहे.

विविध मालिका, चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका त्यांनी निभावल्या होत्या. सध्या 'कुंकू, टिकली आणि टॅटू' या मालिकेत त्या ‘जीजी’ ही भूमिका निभावत होत्या.

'काहे दिया परदेस' ही मालिका आता जरी छोट्या पडद्यावरून दूर झाली असली तरी मुली-जावयासोबत राहणारी... कुटुंबापासून दूर राहणाऱ्या एकट्या मुलांना प्रेमाने डबे बनवून देणारी... जावयासोबत प्रेमानं भांडणारी त्याच्याशी गप्पा-मस्करी करणारी अशी अस्सल कोकणी आजी मात्र प्रेक्षकांच्या आजही आठवणीत आहे.