अभिनेत्री काजल अग्रवालने शेअर केला प्रसूतीचा अनुभव..म्हणाली, पोस्टपार्टम ग्लॅमरस...

मुलाला जन्म देताना होणाऱ्या प्रसूतीकळा, रक्तस्राव, भीती या सगळ्या गोष्टींचा सामान्य स्त्रीप्रमाणे काजलनेही अनुभव घेतला. हा सगळा अनुभव काजलने चाहत्यांसोबत शेअर केला आहे

Updated: Apr 22, 2022, 03:41 PM IST
अभिनेत्री काजल अग्रवालने शेअर केला प्रसूतीचा अनुभव..म्हणाली, पोस्टपार्टम ग्लॅमरस... title=

मुंबईः कोणत्याही महिलेसाठी आई होणं ही खूपच सुंदर गोष्ट आहे. स्वतःच्या शरीरातून एखाद्या जीवाला जन्म देणं ही भावनाही खूपच अतुलनीय गोष्ट आहे. मग ती सामान्य स्त्री असो किंवा सेलिब्रिटी.

असाच काहीसा सुंदर अनुभव घेतला अभिनेत्री काजल अग्रवालने. काजलने नुकताच एका मुलाला जन्म दिला.

मुलाला जन्म देताना होणाऱ्या प्रसूतीकळा, रक्तस्राव, भीती या सगळ्या गोष्टींचा सामान्य स्त्रीप्रमाणे काजलनेही अनुभव घेतला. हा सगळा अनुभव काजलने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 गोल्डन सॅटीन कपड्यात बेबी बंप फ्लॉन्ट करत एक काजलने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात तिने म्हटलंय,नीलच्या जन्मानंतर मी खूपच आनंदी आहे. त्याला जन्म देऊन मी जगातला सर्वात सुंदर गोष्टीचा अनुभव घेतला आहे.

जन्मानंतर बाळाला छातीला लावल्याचा अनुभव हा जगातला सर्वात सुंदर अनुभव होता. या गोष्टीने मला प्रेम, जबाबदारीची जाणीव करून दिली.

काजलने पुढे लिहिलंय, ही गोष्ट म्हणावी तितकी सोपी नव्हती, सातत्याने होणारा रक्तस्राव, ताणली गेलेली स्कीन, ब्रेस्ट पंप, हे सगळं एकदमच घडून येत होतं. त्यामुळे मी 3 दिवस झोपू शकले नाही..सर्वात शेवटी काजल म्हणते, पोस्टपार्टम ग्लॅमरस नसतो मात्र सुंदर नक्कीच असतो.