close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'आहे त्या रुपात स्वत:ला स्वीकारा'; अभिनेत्रीचा #No_Makeup लूक व्हायरल

चेहऱ्यावर मेकअपचा थर न चढवता काजलने फोटो पोस्ट केला आहे.  

Updated: Jun 2, 2019, 08:03 AM IST
'आहे त्या रुपात स्वत:ला स्वीकारा'; अभिनेत्रीचा #No_Makeup लूक व्हायरल

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या चांगलीच चर्चेत आहे. बॉलिवूड कलाविश्वात देखील तिने आपल्या कौशल्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. 'सिंघम' आणि 'स्पेशल २६' चित्रपटातील तिचे अभिनय कौतुकास्पद होते. सध्या इन्टरनेटवर तिचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. चेहऱ्यावर मेकअपचा थर न चढवता काजलने फोटो पोस्ट केला आहे.

इन्स्टाग्रावर फोटो शेअर करत काजलने कॅप्शनमध्ये 'शारीरक आकर्षणाने झपाटलेल्या या जगात लोक स्वत:ला ओळखू शकत नाहीत. सोशल मीडियामुळे आपण स्वत:ची ओळख हरवून बसलो आहोत. आपण सौंदर्य प्रसाधनांवर कोट्यावधी पैसे खर्च करतो. आपले खरे सौंदर्य हे आपल्या बाह्यरूपावर आधारलेले नसून ते आपल्या चारित्र्यावर आधारलेले आहे. महत्वाचे म्हणजे आपण जसे आहोत तसं स्वीकारायला हवं.' असे तिने लिहिले आहे.

'सिंघम' आणि 'मगधीरा' फेम काजल अग्रवालचा मेकअपशिवाय फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. काजल नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या जीवनातील अपडेट्स चाहत्यांना देत असते.