'तान्हाजी' सिनेमातील काजोलचा मराठमोळा लूक

भगवा फडकवत आला 'तान्हाजी'

Updated: Nov 18, 2019, 09:54 AM IST
'तान्हाजी' सिनेमातील काजोलचा मराठमोळा लूक

मुंबई : बहुचर्चित 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' (Tanjahi : The Unsung Warrior) सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. अजय देवगन (Ajay Devgan) पाठोपाठ आता अभिनेत्री काजोलचा (Kajol) सिनेमातील लूक समोर आला आहे. काजोलने इंस्टाग्राम अकाऊंटवर आपला मराठमोळा लूक शेअर केला आहे. 

अजय देवगन आणि काजोलची निर्मिती असलेला सिनेमा 'तान्हाजी' 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अजय देवगन या सिनेमात वीर तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत. काजोलची या सिनेमात महत्वाची भूमिका आहे. काजोलने आपल्या इंस्टाग्रामवर अगदी नाकात नथ घालून, कपाळावर मोठं कुंकू लावून नववारी साडी नेसल्याचं एक पोस्टर पोस्ट केलं आहे. काजोल या सिनेमात सावित्रीबाई मालुसरेंची भूमिका साकारत आहे. (भगवा फडकवत आला 'तान्हाजी') 

काजोल या सिनेमात तान्हाजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. तान्हाजी सिनेमात काजोलवर एक भव्य दिव्य असं गाणं चित्रीत झाल्याची चर्चा आहे. या गाण्यात अतिशय भव्य दिव्य असा सेट असून यामध्ये रांगोळी आणि दिव्यांनी या गाण्याला सुंदर केल्याचं कळतंय. ('जय शिवाजी, जय तान्हाजी' सोशल मीडियावर एकच जयजयकार)

अजय देवगणसोबतच सैफ अली खान महत्वाच्या भूमिकेत असून शरद केळकर, आणि पंकज त्रिपाठी देखील झळकणार आहेत. ऐतिहासिक कथेवर आधारलेला 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' १० जानेवारी २०२० रोजी रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता पाहायला मिळत आहे.