Video: 'ही तर बॉलिवूडची दुसरी जया बच्चन', काजोलने सर्वांसमोरच अजय देवगणला...

Kajol And Ajay Devgan : काजोल कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. त्याला कारण काजोलची कृती. सध्या दुर्गा पूजेतली काजोलची प्रत्येक कृती कॅमेऱ्यात कैद होत आहेत. यावेळेचा अजय देवगनसोबतचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 13, 2024, 10:36 AM IST
Video: 'ही तर बॉलिवूडची दुसरी जया बच्चन', काजोलने सर्वांसमोरच अजय देवगणला...

अजय देवगन वर्षाच्या सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. त्याचा सिंघम अगेन हा चित्रपट लवकरच येतोय. सध्या तो वेगवेगळ्या पद्धतीने चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पत्नी काजोल आणि मुलासोबत दुर्गापूजेला गेल्याच दिसत आहे. यावेळी फॅमिली फोटो काढण्यासाठी पापाराझींसमोर येताच अभिनेत्री काजोलने अजय देवगनला चक्क चिमटा काढला आहे. आता हा काजोलचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

दुर्गा पुजेच्या वेळेचा काजोलचा हा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तर काजोल पहिल्यांदा पापाराझीवर रागावताना दिसत आहे. यानंतर आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये काजोल मंडपात चप्पल घालून येणाऱ्या एका व्यक्तीवर चांगलीच रागावताना दिसत आहे. यावेळी चाहत्यांना काजोलची तुलना ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत केली आहे. 

यासोबत आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जिथे काजोल कुटुंबासोबत फोटो काढत आहे. यावेळी काजोल, अजय आणि मुलगा युग असे उभे आहेत. अजय देवगन युगच्या खांद्यावर हात ठेवतो. अजयने आपल्या खांद्यावरही हात ठेवावा म्हणजे काजोल अजयला सगळ्यांसमोर चिमटा काढते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

लोकांनी या व्हिडीओवर खूप कमेंट केले आहेत. काहींनी म्हटलंय, काजोल, सिंघमला जबदस्ती घेऊन जात आहे. दुसरा युझर्स म्हणतो की, प्रत्येक कुटुंबात या गोष्टी सारख्याच असतात. तिसरा युझर म्हणतो की, जया बच्चन सारखी का वागतेय काजोल? 

जया बच्चनसोबत खास बॉँड 

मानव मंगलानीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काजोलने सुंदर साडी नेसलेली आणि जया बच्चनने पिवळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. दोघेही एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहे. तेव्हा अचानक जया बच्चन यांनी काजोलच्या गालावर किस केले. काजोल अचानक दचकली आणि जोरजोरात हसायला लागली. काजोलची प्रतिक्रिया चाहत्यांनी लगेच लक्षात घेतली. एका चाहत्याने लिहिले- ते खूप चांगले बाँड शेअर करतात. एकाने लिहिले- जया जी पहिल्यांदाच खुश आणि चांगल्या मूडमध्ये दिसली.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More