close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Box office Collection : 'कलंक'ची पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई

'कलंक'ने  'टोटल धमाल', 'गली बॉय', 'केसरी'लाही मागे टाकलं आहे. 

Updated: Apr 18, 2019, 03:49 PM IST
Box office Collection : 'कलंक'ची पहिल्याच  दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई

मुंबई : बहुचर्चित 'कलंक' अखेर १७ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 'कलंक'च्या ओपनिंग कलेक्शनने 'केसरी', 'गली बॉय'सारख्या चित्रपटांना मागे टाकत या वर्षातील सर्वात मोठ्या ओपनिंगचा किताब आपल्या नावे केला आहे. 'कलंक'ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त गल्ला जमवला आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मिडियावर दिलेल्या आकड्यांनुसार, चित्रपटाने २०१९ या वर्षातील सर्वात मोठी ओपनिंग केली असल्याचे म्हटले आहे. चित्रपटासाठी पहिल्याच दिवशी २१ कोटी ६० लाख रुपयांची कमाई केली आहे. 

चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या कमाईच्या तुलनेत 'टोटल धमाल', 'गली बॉय', 'केसरी'ला मागे टाकलं आहे.  'टोटल धमाल'ने पहिल्या दिवशी १६.५०  कोटी, 'गली बॉय'ने १९.४०  कोटी  तर 'केसरी'ने २१.०६ कोटी रुपयांची कमाई केली होती. आता 'कलंक'ने 21.06 कोटी रुपये गल्ला जमवला आहे. 

चित्रपटाचे संपूर्ण बजेट ८० कोटी इतके आहे. परंतु लोकसभा निवडणुकांमुळे बॉक्स ऑफिसवर मोठा परिणाम होत आहे.