close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

शाहरुखकडून 'या' कलाकाराला साप-शिडी खेळण्याचे आमंत्रण

शाहरुखकडून 'डॅडी कूल'ला साप-शिडी खेळण्याचे आमंत्रण

Updated: Apr 18, 2019, 02:42 PM IST
शाहरुखकडून 'या' कलाकाराला साप-शिडी खेळण्याचे आमंत्रण

मुंबई : बॉलिवूड किंग शाहरुख खानची गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावरील बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतची हलक्या-फुलकी बातचीत चांगलीच व्हायरल झाली होती. आता पुन्हा एकदा शाहरुख खानने 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटातील शाहरुखचे ऑनस्क्रिन वडिल अभिनेता अनुपम खेर यांना भारतात आल्यानंतर साप-शिडी खेळण्याचं आमंत्रण दिलं आहे. अनुपम खेर सध्या न्यूयॉर्कमध्ये आहेत. त्यांनी एक ट्विट करत शाहरुखची आठवण येत असल्याचं सांगितलं होतं. त्यासोबतच अनुपम यांनी 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपटातील एका सीनचा व्हिडिओही टाकला आहे. शाहरुखने अनुपम यांच्या ट्विटला प्रतिक्रिया देत त्यांना साप-शिडी खेळण्याचं आमंत्रण दिलं आहे.

अनुपम खेर आणि शाहरुख खान यांनी एकत्र अनेक चित्रपटातून काम केलं आहे. परंतु 'डर' आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटातील दोघांच्या जोडीने प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली. अनुपम खेर यांनी 'आपण एकत्र खूप चांगला वेळ व्यतित केला आहे. आणि आता अचानक आपण मोठे झालो.' असल्याचं ट्विट केलं आहे. 

अनुपम यांच्या ट्विटवर शाहरुखनेही डॅडी कूल म्हणत अनोख्या अंदाजात त्यांना प्रतिक्रिया दिली आहे. 

सध्या शाहरुख त्याच्या आयपीएल टीम 'केकेआर'वर लक्षकेंद्रित करत आहे. नुकताच शाहरुखच्या 'जीरो' चित्रपटाची चीनमधील बीजिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी निवड करण्यात आली असून चीनमधील चाहत्यांकडून शाहरुखवर प्रेमाचा वर्षाव होत आहे.