मुंबई : अभिनेत्री ईशा गुप्तानंतर न्यूड फोटोमुळे आता अभिनेत्री कल्की कोचलिन सध्या चर्चेत आली आहे. कल्कीने इन्स्टाग्रामवर एक न्यूड फोटो शेअर केला असून त्यामुळे तिच्यावर टीका केली जात आहे.
कल्कीच्या या फोटोवर अनेकांनी निगेटीव्ह टीका केली आहे. कल्की नेहमीच आपल्या बिनधास्त बोलण्यासाठी ओळखली जाते आणि सामाजिक मुद्द्यांवर नेहमीच ती आपलं स्पष्ट मत मांडत असते.
मिड-डे सोबत बोलताना कल्की म्हणाली की, ‘मी जे काही करते त्याची मला कधीही लाज वाटत नाही’. कल्कीने हा फोटो तीन दिवसांपूर्वी शेअर केला होता. याला तिने कॅप्शन दिले होते की, ‘प्रकाश आणि अंधाराच्या मध्ये अर्धी.
कल्की ‘जिया और जिया’ या सिनेमात दिसणार आहे. यात रिचा चढ्ढा सुद्धा बघायला मिळणार आहे. या सिनेमात दोन स्वीडनच्या प्रवासावर निघालेल्या महिलांची कथा असणार आहे.