'जास्तीत जास्त 6 महिने जगेल...', 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्रीनं सांगितला मन सुन्न करणारा अनुभव

Kalyani Nandkishor :  कल्याणी नंदकिशोरनं नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितला मन सुन्न करणारा अनुभव 

दिक्षा पाटील | Updated: Oct 19, 2023, 03:46 PM IST
'जास्तीत जास्त 6 महिने जगेल...', 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्रीनं सांगितला मन सुन्न करणारा अनुभव
(Photo Credit : Social Media)

Kalyani Nandkishor : छोट्या पडद्यावरील 'लागिरं झालं जी' या मालिकेनं थोड्याच काळात रसिकांच्या मनात घर केले. ही मालिका आता संपली असली तरी देखील यातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात राज्य करून आहेत. त्यापैकी एक भूमिका जिनं प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे ती म्हणजे आज्याच्या मामीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कल्याणी नंदकिशोरनं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं तिला आलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे.  

Add Zee News as a Preferred Source

कल्याणी नंदकिशोरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून त्यात तिनं तिला आलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. कल्याणी म्हणाली, 'मी कल्याणी नंदकिशोर म्हणजेच झी मराठी वरील "लागिरं झालं जी" मधली आज्या ची मामी, "मन झालं बाजिंदं". मधली गुली मावशी, कलर्स मराठी वरील "राजा राणी ची गं जोडी" मधली पंजाबराव ची बायको कल्याणीबाई, सन मराठी वरील "शाब्बास सूनबाई" मधली ईश्वरी. 27 नोव्हेंबर 2014 ला खुशी चा जन्म झाला आणि साधारण 15 दिवसातच तिच्या हृदयाला छिद्र असल्याचं आम्हाला समजलं. अनेक तज्ञ डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे तिच्या अनेक तपासण्या झाल्यानंतर आणखी एक निदान समोर आलं. तिच्या हृदयापासून फुप्फुसापर्यंत अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या बंद आहेत हे त्या तपासण्या मधुन समजलं.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'फक्त शाहरुख आणि सेक्स...', 'त्या' वक्तव्यामुळे राज कुंद्रा ट्रोल

पुढे कल्याणी म्हणाली, 'अनेकदा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केले पण तिच्या शरीराची अंतर्गत रचना या प्रकारे आहे की तिला भूल देणं सुद्धा शक्य होत नव्हतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार खुशी जास्तीत जास्त सहा महिने जगू शकणार होती. पण मला विश्वास होता की स्वामी आई माझ्या पोटी जन्माला आलेली आहे आणि तीच या संकटातून मला आणि माझ्या लेकीला बाहेर काढेल. आज खुशी 10 वर्षांची झाली आहे. या 10 वर्षांत अनेकदा तिच्यावर संकटं आली. पण माझा विश्वास आणि आम्ही सगळे मिळून तिची घेत असलेली काळजी याच्या जोरावर ती प्रत्येक संकटातून बाहेर पडलेली आहे आणि पुढे सुद्धा ती हा लढा सुरुच ठेवेल अशी मला खात्री आहे. आजचा रंग निळा. निळा रंग म्हणजे पाण्याचं आणि आकाशाचं प्रतीक. निळा रंग व्यापकता दाखवतो. तीच व्यापकता खेळाडू वृत्तीने घेत मी आणि खुशी अगदी खुशीत हसत खेळत आयुष्य भरभरुन जगत आहोत.' 

About the Author