...तर कमल हासनच्या मुलीचे झाले असते अपहरण?

अभिनेता कमल हासन याचा भविष्यात येऊ घातलेला चित्रपट 'महानदी'. हा चित्रपट म्हणे वास्तव घटनेवर आधारीत आहे. आणि ही घटना म्हणजे कमल हासनच्या मुलीचे थांबविण्यात आलेले कथीत अपहरण.

Updated: Aug 15, 2017, 05:42 PM IST
...तर कमल हासनच्या मुलीचे झाले असते अपहरण? title=

मुंबई : अभिनेता कमल हासन याचा भविष्यात येऊ घातलेला चित्रपट 'महानदी'. हा चित्रपट म्हणे वास्तव घटनेवर आधारीत आहे. आणि ही घटना म्हणजे कमल हासनच्या मुलीचे थांबविण्यात आलेले कथीत अपहरण.

 कमल हासन हा बॉलिवूड आणि त्याही पेक्षा दक्षिणेकडील एक दमदार अभिनेता. त्याच्या अभिनय आणि वास्तव जीवनातील अनेक किस्स्यांची जोरदार चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये असते. सध्याही तो महानदी या चित्रपटामुळे आणि त्याच्या कथानकामुळे चर्चेत आला आहे. खरेतर अभिनेता कमल हासन हा एक अनुभवी अभिनेता आहे. गेली जवळपास 58 वर्षे तो अभिनय क्षेत्रात काम करतो आहे. त्याने तब्बल ७० चित्रपटांची एक यादी नुकतीच जाहीर केली. या यादीत चित्रपटासोबत त्याच्या आयुष्यातील एखादातर अनुभव, प्रसंग जोडला गेला आहे.

दरम्यान, ही यादी करत असताना त्याने सुरूवातीलाच म्हटले आहे की, चित्रपट करत असताना मी इतरांप्रमाणे शिफारस करत नाही. तसेच, मला जे वाटते ते मी लोकांवर लादण्याचा प्रयत्न करत नाही. चित्रपट हा माझा व्यवसाय आहे. माझे जीवन हे सुद्धा एखाद्या चित्रत्रपटाप्रमाणेच आहे. जे इतर लोकांच्या जीवनाच्या रस्त्यापेक्षा काहीसे वेगळे आहे. असे सांगतानाच कमल म्हणतो, तुम्ही एखाद्याला नोटीस करत असताना तो जसा आहे तसा स्वीकारा. उगाच तुम्ही त्याच्या प्रेमात पडून नाक किंवा त्याचे टीकाकारही बनू नका.

दरम्यान, कमल हासनने आगामी चित्रपट महानदी बाबतही मत व्यक्त केले आहे. कमल हासन म्हणतो की, महानदी हा वास्तवतेशी अधिक जोडला गेलेला आहे. काही वर्षांपूर्वी माझ्या घरीही एक अपहरण नाट्य घडले होते. जे माझ्या मुलीबाबत होते. माझ्या घरातील काही नोकरांनी पैशासाठी माझ्या मुलीचे अपहरण करण्याचा कट रचला होता. मात्र, हा कट वास्तवात येण्याआधीच त्याची मला खबर लागली होती. माझ्या नोकारांनीच असा कट करावा, हे समजताच मी प्रचंड चिडलो. माझ्या मुलीच्या बचावासाठी मी जे जे करायला हवे होते ते मी केले. महानदी चित्रपटही अशाच वास्तवतेशी संबंधीत घटनेवर बेतला असल्याचे कमल हासनने म्हटले आहे.