#MeToo वर साऊथ सुपरस्टार कमल हसन यांची प्रतिक्रिया

काय म्हणाले कमल हसन

#MeToo वर साऊथ सुपरस्टार कमल हसन यांची प्रतिक्रिया  title=

मुंबई : देशभर #MeToo चा वणवा पसरल्यानंतर पहिल्यांदाच तामिळ अभिनेता - राजनेता कमल हसन यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कमल हसन यांच असं म्हणणं आहे की, ज्या लोकांवर महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. त्यांनी त्या आरोपांवर उत्तर दिलं पाहिजे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या मोहिमेला आता गती मिळत आहे. अनेक महिला आपल्या कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल बोलत आहेत. 

कमल हसन यांना याबाबत विचारल्यावर त्यांनी सुरूवातीलाच असं सांगितलं की, आरोप केलेल्या व्यक्तींनी उत्तर दिलं पाहिजे. मक्कल निधी मय्यमच्या प्रमुखांनी सांगितलं की, प्रत्येकाने उत्तर देणं ठिक असणार नाही. प्रत्येकाने योग्य पद्धतीने आपलं म्हणणं मांडाव. महिलांनी योग्य पद्धतीने आपलं म्हणणं मांडल तर काहीच हरकत नाही. 

#MeToo ची ही आग बॉलिवूडमध्ये धगधगत असताना. बहुप्रतिक्षित असलेल्या 'हाऊसफुल्ल 4' या सिनेमातील कलाकारांनी मोठा निर्णय घेतला आहे. साजिद खानवर 3 महिलांनी लैंगिक अत्याचाराने आरोप केल्यानंतर आता त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.  अक्षय कुमारने हाऊसफुल 4 चं शुटींग थांबविण्यास सांगितलं तर साजिद खानने हा सिनेमा करणं थांबवलंय. त्यानंतर नाना पाटेकरनेही सिनेमातून बॅकआऊट केलंय. यावर आता रितेश देशमुखने ट्विटी करुन आपलं मत नोंदवलंय.