मुंबई : फिल्म 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी' चे निर्माता कमल जैन यांच म्हणण आहे की, दिग्दर्शक क्रिश यांनी या सिनेमासाठी मेहनत घेतली आहे. आपल्या नव्या सिनेमात व्यस्त असल्यामुळे अभिनेत्री कंगना रानौत यांना सिनेमातील पॅचवर्क पूर्ण करण्यासाठी आणि काही दृश्य चित्रित करण्यासाठी योग्य मानलं आहे. त्यांनी म्हटलं की, सिनेमाला अभिनेत्रीने हायजॅक केलेलं नाही.
सिनेमाबद्दल होणाऱ्या चर्चांना पूर्ण विराम देताना कमल जैन यांनी सांगितलं की, सिनेमातील काही शुटिंग ही मुंबईजवळच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओत होत आहे. शेवटचं शेड्यूल पाहिल्यानंतर असा अंदाज आहे की, आणखी काही गोष्टी शुट करण्याची गरज आहे.
तसेच पुढे त्यांनी सांगितलं की, हा भाग लिहिल्यानंतर कंगनाशी आम्ही पुढील तारखांसदर्भात संवाद साधला. मात्र क्रिश, तोपर्यंत आपल्या पुढच्या प्रोजेक्टला तारखा देऊन झाला होत. कंगनाने अगदी सुरूवातीपासून या सिनेमाशी जोडलेली असल्यामुळे पुढील जबाबदारी उचलण्यासाठी ती योग्य व्यक्ती असल्याचं जाणवलं.
यामुळे हा प्रोजेक्ट हायजॅक झालेला नाही. त्यामुळे घेतलेला प्रत्येक निर्णय हा निर्माता आणि स्टुडिओच्या समर्थनातला आहे. काही दिवसांपूर्वी लेखक अपूर्व असरानीने सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगनावर निशाणा साधला होता. सिनेमात कॅमेऱ्याच्या मागे सतत स्वतःची उपस्थिती दर्शवणे, समोरच्यावर हावी होणे आणि स्वतःची गोष्ट खरी करण्यासाठी काहीही करणं यामुळे कंगना स्वतःला खड्यात ठकलत आहे.