कंगना ऐवढी 'ढ' असून कसा मिळाला चारवेळा राष्ट्रीय पुरस्कार; असं तुम्हाला वाटेल...

कंगनाने AIPMT परीक्षेसाठी तयारी केली होती; पण झालं  काही वेगळचं....      

Updated: Mar 23, 2021, 03:56 PM IST
कंगना ऐवढी 'ढ' असून कसा मिळाला चारवेळा राष्ट्रीय पुरस्कार; असं तुम्हाला वाटेल... title=

मुंबई : बॉलिवूड क्विन कंगना रानौतसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. आज तिचा वाढदिवस आणि तिच्या आगामी 'थलायवी' सिनेमाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. कंगनाच्या या खास दिवसाचं औचित्य साधत तिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेवू. इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखातील तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. कंगना लहानपणी अतिशय हट्टी होती. असं खुद्द कंगनाने मुलाखतीत सांगितलं आहे. 

हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यात राहाणाऱ्या कंगनाचे विचार तिच्या कुटुंबाला मान्य नव्हते. तिने 12वीत असतानात अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं आणि तिचं हे  स्वप्न पूर्ण देखील झालं. महत्त्वाचं म्हणजे आता चारवेळा राष्ट्रीय परस्कारावर वर्चस्व गाजवणारी कंगना 12 वी मध्ये केमिस्ट्री विषयात नापास झाली होती.

एवढचं नाही तर तिने All India Pre Medical Test (AIPMT) परीक्षेसाठी देखील तयारी केली होती. ती डॉक्टर म्हणून करियर करण्याच्या विचारात होती. पण तिच्या नशिबात काही वेगळचं होतं. त्यानंतर तिने सगळं काही सोडून दिल्लीच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. 

तिने सुरूवातीला नाटकात काम केलं. त्यानंतर तिने 'गँगस्टर' सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळाल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज ती एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.