ट्विटर अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर भडकलेल्या कंगनाची पहिली प्रतिक्रिया

वादग्रस्त ट्विट कंगनाला भोवले 

Updated: May 4, 2021, 03:25 PM IST
ट्विटर अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर भडकलेल्या कंगनाची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : कंगना रानौतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असणाऱ्या कंगनावर ट्विटरचे नियम फॉलो न करण्याचे आरोप लावण्यात आला आहे. अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर ट्विटरवर #KanganaRanaut हा हॅशटॅग ट्रेंड झाला. आता कंगनाने या सगळ्या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

कंगनाने म्हटलं की,'ट्विटरने कायमच सिद्ध केलं आहे की, त्याचा जन्म अमेरिकेत झाला. ते सफेद व्यक्ती आहेत. भारतात राहणाऱ्यांना गुलामच बनवण्याचा प्रयत्नात असतात. ते तुम्हाला सांगणार की, तुम्ही काय विचार करता, काय बोलता आणि काय करायचं आहे. माझ्याकडे अनेक प्लॅटफॉर्म आहेत ज्यामधून मी माझा आवाज अधिक स्पष्टपणे मांडू शकते.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

गेल्या काही दिवसांपासून कंगना युझर्सच्या टार्गेटवर होती. ज्यांच्या माध्यमातून कंगनाच ट्विटर अकाऊंड सस्पेंड करण्याची मागणी केली जात होती. असं म्हटलं जातं की, अनेक वादग्रस्त ट्विटमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कंगनाने लिहिलं आहे की, भाजपला आसाम आणि पुडुचेरीत विजय मिळवला आहे. मात्र तेथून कोणत्याच हिंसेची बातमी आली नाही. टीएमसी बंगालची निवडणुक जिंकली आहे आणि तेथून शेकडो लोकांच्या मृत्यूची बातमी आली. मात्र लोकं म्हणतील मोदीजी तानाशाह आहेत आणि ममता बॅनर्जी धर्मनिरपेक्ष आहेत.

कंगना ट्विटरवर खूप ऍक्टिव असते. आणि आपलं मत सडेतोडपणे मांडते. अनेकदा तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे कंगनावर खूप टीका देखी झाली. कंगनाने महाराष्ट्र सरकारच्या विरोधातही ट्विट केलं होतं. याची जोरदार चर्चा रंगली आहे.