मुंबई : आपल्या बिनधास्त वक्तव्यांनी सर्वांनाच धक्का देणा-या कंगना राणावतने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विमान प्रवासात छेडछाड प्रकरणी ‘दंगल’ सिनेमात कलाकार झायरा वसीमवर टीका होत आहेत. यावर कंगना राणावतने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने झायरावर टीका करणा-यांना खडेबोल सुनावले आहेत.
१७ वर्षाची ‘दंगल’ गर्ल झायरा वसीमने आरोप लावला होता की, दिल्ली ते मुंबई प्रवासादरम्यान विमानात तिच्यासोबत छेडखानी झाली. हा प्रकार तिने लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणला होता.
कंगना यावर म्हणाली की, ‘अभिनेत्रीने प्रवासा दरम्यान तिला जो त्रास झाला ते तिने सांगितले, यामुळे तिच्यावर टीका केल्या जात आहे. ही खूप निराशाजनक बाब आहे. अनेकजण म्हणत आहेत की, त्याने सहज आर्मरेस्टवर पाय ठेवला होता आणि झोपला होता. माझ्यासाठीही हे फार अपमानजनक ठरलं असतं. मी असती तर त्याचा पाय तोडला असता’.