मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. मात्र यावेळी ती कुठल्याही वक्तव्यामुळे नव्हे तर चक्क बिकिनी फोटोमुळे ट्रोल झालीये. कंगनानं मॅक्सिकोमधील बेटावर काढलेला बिकीनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. यावरुन ट्रोलर्सनी तिची चांहलीच खिल्ली उडवली आहे.
कंगनाने यापूर्वी अनेक सेलिब्रिटींच्या कपड्यांवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर तिचा हा बिकिनी अवतार पाहून हिच का हिंदू संस्कृती? असा टोला काही नेटकऱ्यांनी लगावलाय. मात्र या ट्रोलर्सला कंगनाने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“काही लोक माझ्या बिकिनी फोटोवर टीका करत आहेत. जर देवी भैरवी आपले केस मोकळे सोडून, वस्त्रहीन आणि रक्त ग्रहण करणाऱ्या प्रतिमेसह तुमच्या समोर आली तर तुम्ही काय कराल? तुम्ही स्वत:ला भक्त म्हणता? धर्माचं अनुकरण करा… जय श्री राम” अशा आशयाचं ट्विट करुन तिनं ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं आहे.