आर माधवनचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लूकमधील तो फोटो

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता आर माधवनची इन्स्टाग्राम पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. अभिनेता आर माधवननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही

Updated: Dec 23, 2020, 05:46 PM IST
आर माधवनचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लूकमधील तो फोटो

मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता आर माधवनची इन्स्टाग्राम पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. अभिनेता आर माधवननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये त्याचे वेगळवेगळे लुक्स पाहायला मिळत आहे. आर माधवननं शेअर केलेल्या फोटोंमध्ये एक फोटो सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लूकमधील तो फोटो आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषातील फोटो शेअर करतात माधवनच्या चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. त्याच्या या लूकसाठी त्याचं चांगलंच कौतुक होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

लवकरच ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड चालू आहे, ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’हा चित्रपट इस्रोमधील ज्येष्ठ वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. 

या बायोपिकद्वारे आर. माधवन दिग्दर्शनात आपले पाऊल टाकत आहे. काही महिन्यांपूर्वी चित्रपटाचे शूटींग सुरू आहे. त्याचा एक फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.