पोलिसांच्या तक्रारींना कंटाळलेली अभिनेत्री म्हणतेय 'यंदाच्या वर्षी मला प्रेमपत्र हवेत...'

अभिनेत्रीला का करावा लागतो सतत पोलिसांच्या तक्रांरीचा सामना ?   

Updated: Jan 3, 2022, 09:59 AM IST
पोलिसांच्या तक्रारींना कंटाळलेली अभिनेत्री म्हणतेय 'यंदाच्या वर्षी मला प्रेमपत्र हवेत...' title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. अशा अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नेहमी वादाचं मुकूट डोक्यावर मिरवणारी अभिनेत्री कंगना रानौत. कंगना तिच्या चित्रपटांमुळे कमी तर तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अधिक चर्चेत असते. आता देखील कंगनाने नववर्षाचं मुहूर्त साधत विरोधकांवर निशाणा साधला आहे. कंगनाने इन्स्टाग्रान पोस्टद्वारे 2022 साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत कंगना म्हणते, यंदाच्या वर्षी मला पोलिसांच्या तक्रारी आणि एफआयआर कमी आणि जास्त प्रेमपत्रे हवी आहेत... सध्या तिची ही पोस्ट तुफान चर्चेत आली आहे. नववर्षाच्या मुहूर्तावर कंगना एका मंदिरात गेली होती. यावेळी तिने त्या मंदिराचं वैशिष्ट्य देखील सांगितलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कंगना म्हणते, 'जगात एकच राहू केतू मंदिर आहे. तिरुपती बालाजीच्या अगदी जवळ.., मी माझ्या प्रिय शत्रूंच्या दयेसाठी तिथे गेली होती, या वर्षी मला कमी पोलिस तक्रार/ एफआयआर आणि जास्त प्रेमपत्रे हवी आहेत. जय राहू केतू जी..' सध्या तिचं हे कॅप्शन चर्चेत आहे. 

कामाच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर ती 'धाकड' साठी तयारी करत आहे, चित्रपट एक ऍक्शन थ्रिलर आहे. महत्त्वाचं म्हणजे चित्रपट 8 एप्रिल 2022 रोजी रिलीज होणार होता. मात्र आता चित्रपट मे 2022 पर्यंत प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनाची  तारीख अद्याप कळू शकलेली नाही.