'पैसे आहेत तर, देशाची सेवा कर..' राखी सावंतने साधला कंगनावर निशाणा

कंगना vs राखी : सोशल मीडियावर तुफान चर्चा

Updated: Apr 29, 2021, 01:46 PM IST
'पैसे आहेत तर, देशाची सेवा कर..' राखी सावंतने साधला कंगनावर निशाणा

मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्विन अभिनेत्री राखी सावंत आणि वादग्रस्त अभिनेत्री कंगना रानौत सध्या जोरदार चर्चेत आल्या आहेत. तसं बघायला गेल तर, त्या रंगणाऱ्या चर्चांमागे कारण देखील तसंच आहे. सध्या सोशल मीडियावर राखीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये राखीने कंगनावर निशाणा साधला आहे. राखी कंगनाला म्हणाली, 'कठीण काळात देशाला मदत कर...' 

राखीचा व्हिडिओ विरल भयानीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती कारमधून उतरते आणि कारमधून उतरताचं सर्वत्र सॅनिटायझर मारायला लागते. कोरोना आता मोठा होत  आहे. त्यामुळे काळजी घ्या असं देखील ती सांगताना दिसत आहे. शिवाय राखीने सर्वांना दोन मास्क लावण्याचा सल्ला दिला. व्हिडिओमध्ये तिने देखील दोन मास्क घातले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अखेर पापाराजीने  कंगनाने केलेल्या वक्तव्याविषयी एक प्रतिक्रिया मागितली. देशाची परस्थिती अत्यंत कठीण आहे. मोदीजी बरोबर आहेत की चुकीचे, करोना रुग्णांना अनेक ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाही. तुझे यावर काय मत आहे. असा प्रश्न राखीला विचारण्यात आला. 

राखी म्हणाली, 'कंगना कृपा करून तू देशाची सेवा कर तुझ्याकडे कोट्यावधी रुपये आहेत तर थोडे पैसे ऑक्सिजन खरेदीसाठी खर्च कर आणि लोकांना देखील मदत कर...' राखीच्या या प्रतिक्रियेमुळे हा व्हिडिओ सध्या तुफान चर्चेत आहे.