Rishabh Shettys Kantara : 'कांतारा 2' बाबत मोठी घोषणा; दिग्दर्शकानंच स्पष्ट केलं, आता सिक्वल विसरा.... ; पण असं का?

Rishabh Shettys Kantara : ऋषभ शेट्टीने (Rishab shetty) कांताराबाबतीत केलेल्या मोठ्या घोषणेने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. कांताराच्या दुसऱ्या भागामधून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या..

Updated: Feb 7, 2023, 12:57 PM IST
Rishabh Shettys Kantara : 'कांतारा 2' बाबत मोठी घोषणा; दिग्दर्शकानंच स्पष्ट केलं, आता सिक्वल विसरा.... ; पण असं का? title=

Rishabh Shettys Kantara 2 :: दाक्षिणात्य अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा (Rishabh Shetty) 'कांतारा' (Kannada Movie Kantara) या सिनेमाने  प्रेक्षकांच्या  मनावर  चांगलंच  गारुड  निर्माण केलं . 16 करोडमध्ये बनलेल्या या सिनेमाने 400 कोटींची कमाई केली होती . चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षणी सिनेमागृहांबाहेर तुफान गर्दी केली होती. सिनेमाचे सर्व शो चांगलेच हाऊसफुल होऊन चालत होते. हा चित्रपट सुरुवातीला कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता, परंतु प्रचंड लोकप्रियता आणि मागणीमुळे हा चित्रपट अनेक भाषांमध्ये डब करण्यात आला. (Kantara)

कांतारा (Kantara 2) चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर Amazon Prime Video वर प्रदर्शित  (Kantara OTT Release) झाला होता . OTT वरसुद्धा सिनेमाला चांगल्या प्रतिसाद मिळाला होता.  सुपरहिट कन्नड सिनेमा 'कांतारा'ने जगभरात बक्कळ कमाई केली.  गेल्या वर्षी 'कांतारा'ने बॉक्स ऑफिसवर आपला ठसा उमटवला होता. कर्नाटकातील पारंपरिक प्रथांवर आधारित हा सिनेमा प्रेक्षकांना खूप भावला होता.प्रेक्षक या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. 

कांताराच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी 

दिग्दर्शक ऋषभने नुकतेच 'कांतारा पार्ट 2' ची घोषणा केली आहे.  ट्विट करून ऋषभ शेट्टीने 'कांतारा 2' 2024 मध्ये रिलीज होणार असल्याचं जाहीर केलंय.  यातही एक ट्विस्ट असणार आहे , म्हणजे हा पार्ट 2 सिक्वेल नसून या सिनेमाचा प्रिक्वेल आहे. (kantara 2  willbe a prequel of movie

काय असणार कांतारा पार्ट 2 मध्ये

खूप वर्षांआधीची स्टोरी टाकून 'कांतारा' चा प्रिक्वेल शूट करण्यात येत आहे. माहितीनुसार शूटिंगला सुरवात देखील झाली आहे, त्यामुळे कांतारा पार्ट 2 सुद्धा प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी आशा सिनेमाच्या टीमला आहे . 

'कांतारा'  सिनेमाला प्रेक्षकांनी तर डोक्यावर घेतलंच शिवाय, समीक्षकांकडूनसुद्धा सिनेमाला चांगलीच पसंती मिळाली होती. भूत कोलाचा सिक्वेन्स हा सर्वात सुपरहिट ठरला होता. सिनेमॅटोग्राफीसाठी सिनेमातील काही दृश्यांचं विशेष कौतुक करण्यात आलं होतं.

चित्रपटात , ऋषभ शेट्टीसोबत  सप्तमी गौड़ा, मानसी सुधीर, किशोर (Kishore), अच्युत कुमार ,प्रमोद शेट्टी (pramod shetty) यांनीसुद्धा महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. कांतारा सुरवातीला कन्नड भाषेत रिलीज करण्यात आला होता, मात्र प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता नंतर तो हिंदी, तामिळ, मल्याळम आणि तेलगू भाषेत प्रसारित करण्यात आला.