कपिल शर्माच्या आईकडून अखेर सूनेची पोलखोल

 पत्नी VS आई... सूनेबद्दल काय आहे कपिल शर्माच्या आईचं मत?   

Updated: Nov 29, 2021, 01:01 PM IST
कपिल शर्माच्या आईकडून अखेर सूनेची पोलखोल

मुंबई : 'द कपिल शर्मा शो'ने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांचे प्रमोशन करण्यासाठी शोमध्ये येतात आणि कधीकधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा करतात. सध्या शोच्या एका एपिसोडमध्ये अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री चित्रांगदा सिंह 'बॉब बिस्वास' सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहोचले होते.

यंदाच्या एपिसोडमध्ये कपिल शर्माची आई देखील प्रेक्षकांमध्ये उपस्थित होती. यादरम्यान कपिलच्या आईने सून गिन्नीचा पर्दाफाश केला. कपिलच्या आईने सांगितले की, सून त्यांना घरी राहू देत नाही. त्यानंतर जमलेले सर्व प्रेक्षक हसू लागतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शो दरम्यान कपिल आईला म्हणाला, 'आधी तू मला सतत लग्न कर असं सांगत होतीस, आता मी लग्न केलं आहे तर तू सूनेसोबत घरी का नाही राहत...' यावर कपिलच्या आई म्हणाल्या, 'माझी सून मला घरी राहू देत नाही. सतत म्हणते लवकर शोमध्ये जा...' यानंतर अभिषेक आणि चित्रांगदा पोट धरून हसू लागतात. 

सांगायचं झालं तर 2018 मध्ये कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांनी लग्न केलं. कपिल शर्मा आणि गिन्नी यांनीही हिंदू रितीरिवाजांनुसार शीख पद्धतीने लग्न केले. त्यांना आता एक मुलगी आणि एक मुलगा आहे.