वाद विसरून कपिल शर्माने सुनील ग्रोव्हरला दिल्या वाढदिवसाच्या या खास शुभेच्छा !

कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यामध्ये सुरू असलेले शीतयुद्ध संपल्याची चिन्हं आहेत.

Updated: Aug 4, 2017, 01:39 PM IST
वाद विसरून कपिल शर्माने सुनील ग्रोव्हरला दिल्या वाढदिवसाच्या या खास शुभेच्छा !  title=

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यामध्ये सुरू असलेले शीतयुद्ध संपल्याची चिन्हं आहेत.

सोशल मिडियातून त्यांच्यामधील वाद फॅन्सपर्यंत पोहचत होते. मात्र कालच ( 3 ऑगस्ट) दिवशी सुनील ग्रोव्हरला कपिलने ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर खुलेपणाने सुनीलनेही त्याला प्रतिसाद दिला. त्यामुळे गेले काही दिवस  कपिल आणि सुनीलच्या मैत्रीमध्ये असलेला तणाव हलका होत आहे.

 

 

सुनीलला बर्थ डे विश करताना,' तुझ्यावर देवाचा आशिर्वाद राहू दे, तुला खूप आनंद आणि प्रेम मिळू दे' अशा भावना कपिलने व्यक्त केल्या. त्यावर फॅन्सनीही प्रतिसाद दिला.

 

कपिलने बर्थ डे विश केल्यानंतरही सुनीलनेही मागील राग- फुगवे विसरून कपिलला प्रतिसाद दिला. त्याच्या बर्थ डे विश वर रिप्लाय देताना कपिललाही चांगल्या आरोग्यासाठी  शुभेच्छा दिल्या. ' धन्यवाद भाजी ! आनंदी आणि हेल्दी रहा' असा खास संदेशही लिहला.

 

16 मार्च दिवशी ऑस्ट्रेलियाहून परतताना सुनील आणि कपिल  यांच्यामध्ये वाद झाले होते. त्यानंतर सुनील ग्रोव्हर कपिल शर्मापासून तसेच त्याच्या कॉमेडी शोपासूनही दूर झाला होता.