तुझ्यात जीव रंगला टीआरपीमध्ये पुन्हा नंबर वन

राणादा आणि पाठकबाई यांच्या प्रेमकहाणीवर आधारित तुझ्यात जीव रंगला ही मालिका टीआरपीमध्ये नंबर वन आहे. 

Updated: Aug 4, 2017, 01:31 PM IST
तुझ्यात जीव रंगला टीआरपीमध्ये पुन्हा नंबर वन

मुंबई : राणादा आणि पाठकबाई यांच्या प्रेमकहाणीवर आधारित तुझ्यात जीव रंगला ही मालिका टीआरपीमध्ये नंबर वन आहे. 

तुझ्यात जीव रंगला ५२५२ रेटिंगसह अव्वल स्थानी आहे. तर शनाया, राधिका आणि गुरुनाथ यांची माझ्या नवऱ्याची बायको ४९१२ रेटिंगसह दुसऱ्या स्थानी आहे. 

चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा आणि भारत दौऱा यांनी टॉप ५मध्ये स्थान मिळवलेय. गौरी आणि शिवची कथा असलेली काहे दिया परदेस या यादीत चौथ्या स्थानी आहे. 

दोन दिवसांपूर्वीच चूक भूल द्यावी घ्यावी ही मालिका संपून गाव गाता गजाली ही नवी मालिका सुरु झालीये. तसेच दुपारच्या वेळेत जाडूबाई जोरात ही देखील नवी मालिका सुरु करण्यात आलीये. या मालिकेच्या कथा जरी इंटरेस्टिंग वाटत असल्या तरी प्रेक्षक या मालिकेला कसा प्रतिसादा देतात ते पाहावे लागेल.