Karan Johar Airport : करण जोहरला एअरपोर्टवर अडवलं; पोलिसांची कारवाई पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक, पाहा VIDEO

Karan Johar Airport Checking Viral Video: करण जोहर हा आपल्या वेगळ्या स्वॅगसाठी (Karan Johar) ओळखला जातो. त्याच्यावर अनेकदा ट्रोलर्सकडूनही टिका सहन करावी लागते. ट्रोलर्सचं शुक्ल काष्ट करण जोहरच्या मागून काही जायचं (Karan Johar Trolled) नाव घेत नाहीये. आता परत तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

Updated: Mar 21, 2023, 04:55 PM IST
Karan Johar Airport : करण जोहरला एअरपोर्टवर अडवलं; पोलिसांची कारवाई पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक, पाहा VIDEO
Karan Johar Airport checking Video Viral Mumbai Airport Police Stops him to check his details entertainment news marathi

Karan Johar Airport Checking Video: अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar Latest News) कायमच चर्चेत असतो. त्याची या ना त्या कारणानं चर्चा होत असते. करण जोहरला (Karan Johar Airport Checking Today) अनेकदा सोशल मीडियावरून ट्रोलही करण्यात येते. तीन वर्षांपुर्वी करण जोहरला नेपोटिझमच्या टिकेला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागले होते. सध्या करण जोहरचं अनेक आगामी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे बॉलिवूडविश्वात (Bollywood) करण जोहरची चर्चा आहे. करणचे अनेक व्हिडीओज हे व्हायरल होत असतात. तो त्याच्या फॅन्सना अपडेट ठेवण्यासाठी इन्टाग्रामवरही खूप सक्रिय असतो. सध्या करण जोहरचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ (Karan Johar Video) सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरतो आहे. 

बॉलिवूड सेलिब्रेटी हे पुष्कळदा एअरपोर्टवर स्पॉट होतात. बॉलिवूड सेलिब्रेटी हे इतक्यांदा एअरपोर्टवर (Karan Johar Airport Look) स्पॉट होत असल्यानं ते ट्रोलही होतात. हे सेलिब्रेटी सारखे सारखे एअरपोर्टवर काय करत काय असतात? नक्की हे जातात तरी कुठे? यावर अनेकदा नेटकऱ्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थि होत राहते. ट्रोलर्स कुठल्या ना कुठल्या सेलिब्रेटीला (Karan Johar Trolled) ट्रोल करायचे पाहत असतातच आता यावेळी त्यांच्या जाळ्यात सापडलाय करण जोहर!

एअरपोर्टवरील करन जोहरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये आपलं टिकीट चेक करू घेण्यासाठी करण जोहर टिकीट काऊंटरवर पोहचतो आणि तेव्हा त्याला पोलिस अडवतात. परंतु नक्की त्याला पोलिस का बरं अडवतात, त्याच्या बॅगेत काही (Karan Johar Trolled Malaika Arora) सापडले आहे का, की नक्की काय प्रकार झाला आहे याकडे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. तेव्हा पाहूया हा प्रकार नक्की आहे तरी काय? 

पोलिसांनी का अडवलंय? 

करण जोहरनं यावेळी ब्लॅक रंगाचा टी-शर्ट आणि व्हाईट रंगाचा जॅकेट (Mumbai Police) घातला होता. तसेच त्यानं काळे सनग्लासेस लावले होते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, करण जोहर हा एअरपोर्टच्या आतमध्ये जाताना दिसत होता. तेवढ्यात पोलिस त्याला अडवतात आणि त्याला त्याचे टिकट दाखवायला सांगतात. त्यानंतर तो आपल्या बॅगेतून काही पेपर्स काढतो आणि पोलिसांना दाखवते. त्यानंतर तो पुन्हा आतमध्ये जातो. 

करण जोहर ट्रोलर्सच्या निशाण्यावर

आपले पेपर्स आणि डॉक्यूमेंट्स एअरपोर्ट सिक्यूरिटीला (Mumbai Airport Security) दाखवायला विसरला म्हणून करण जोहर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. त्यातून ट्रोलर्सनी करण जोहरवर विनोदी टिप्पणी केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करन जोहर कॅट वॉक करता करता आपले सिक्यूरिटीला पेपर्स दाखवायलाही विसरला, तर काहींनी करण जोहरची चांगलीच फजिती झाली अशीही कमेंट केली आहे.