करन जोहर आणखी एका स्टारकिडचा होणार 'गॉड फादर'

जान्हवी, सारा, अनन्या नंतर कपूर कुटुंबाची मुलगी बॉलिवूडमध्ये 

Updated: Mar 22, 2021, 02:46 PM IST
करन जोहर आणखी एका स्टारकिडचा होणार 'गॉड फादर'

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर, सारा अली खान नंतर आणि कपूर कुटुंबाची लेक बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर लवकरच बॉलिवूड  डेब्यू करणार आहे. करण जोहर शनायाला बॉलिवूडमध्ये ब्रेक देणार आहे. शनायाने Dharma Cornerstone Agencyसोबत काम करणार आहे. करन जोहरने यासंदर्भातील माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. शिवाय करनने शनायाचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

त्याने शनायाचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये #DCASquad असं लिहित शनायाचं स्वागत केलं आहे. जुलै महिन्यात शनायाचा पहिला सिनेमा प्रदर्शित होणार असून शनायाचा अविस्मरणीय प्रवास सुरू होणार आहे. एवढचं नाही तर शनायाने देखील तिच्या सोशल मीडियावर नव्या प्रवासाचे फोटो पोस्ट केले आहेत. 

फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शमध्ये 'आजच्या दिवसाची सुरवात अत्यंत उत्तम झाली. 'Dharma Cornerstone Agencyच्या कुटुंबासोबत नव्या प्रवासाची सुरूवात झाली आहे. त्याचप्रमाणे मझ्या पहिल्या सिनेमासाठी उत्सुक आहे. सध्या तिची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. 

शनाया  कपूरने तिच्या करियरची सुरूवात 'गुंजन सक्सेना' सिनेमाच्या माध्यमातून  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली. सांगायचं झालं तर शनाया बॉलिवूडमध्ये  येण्याच्या आधिच प्रसिद्ध झाली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ४ लाखांपेक्षा  जास्त फॉलोअर्स आहे. तर आता शनाया तिच्या नव्या प्रवासात यशस्वी ठरते की नाही हे येणारा काळचं ठरवेल.