विराट बजावतोय वडिलांचं कर्तव्य; अशी घेतोय लेकीची काळजी

विराट आणि आनुष्काने त्यांच्या मुलीला कॅमेऱ्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला; पण...

Updated: Mar 22, 2021, 01:32 PM IST
विराट बजावतोय वडिलांचं कर्तव्य; अशी घेतोय लेकीची काळजी  title=

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या त्यांच्या मुलीची काळजी घेताना दिसत आहेत. विरूष्काच्या मुलीचे नाव वामिका असं आहे. विराट आणि आनुष्काने त्यांच्या मुलीला कॅमेऱ्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येक वेळी अनुष्का वामिकाचा  चेहरा लपवत असते. काही दिवसांपूर्वी त्यांनी वामिकाचा एक  फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. पण त्यामध्ये देखील वामिकाचा चेहरा त्यांनी लपवला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आता देखील विराट कोहली आणि अनुष्का शर्माला वामिकासोबत एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. कोहली कुटुंब सध्या पुण्यात आहे. एअरपोर्टवर विराट, अनुष्का आणि वामिकाचा एक फोटो कॅमेऱ्यात कैद करण्यात आला.  या फोटोमध्ये अनुष्काने वामिकाला घेतलं असून विराटने सर्व बॅग्स सांभाळत आहे. 

विराट आणि आनुष्काचा वामिकासोबतचा फोटो तुफान व्हायरल होत. त्याचप्रामाणे चाहते त्यांच्या फोटोवर प्रतिक्रिया देखील देत आहेत. तर या फोटोंमुळे विरुष्काचं कौतुकही होत आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma) घरी ११ जानेवारी २०२१ रोजी एका गोंडस मुलीचं आगमन झालं.