मुंबई : करण जोहरचा हिट रेडिओ कार्यक्रम 'कॉलिंग करण'चा दुसरा सीझन सुरू झालाय. आत्तापर्यंत या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड कलाकारांनी सहभाग नोंदवत करणला अनेक प्रश्न विचारलेत... करणदेखील हा कार्यक्रम चांगलाच एन्जॉय करताना दिसतोय. अंशुमान खुराना, दिलजीत दोसांज, करिना कपूर खान यांच्यानंतर आता करणचा जवळचा मित्र आणि अभिनेता रणबीर कपूरदेखील या कार्यक्रमात सहभागी झालाय.
रणबीरनं या कार्यक्रमात फोन करत करणला त्याच्या मनातला एक प्रश्न केला. 'जर तुम्ही एका रिलेशनशीपमध्ये एखादी चूक करताय आणि पुन्हा चूक करताय तर तुम्ही ही चूक सुधारण्यासाठी कोणता योग्य मार्ग निवडावा?'
रणबीर नक्की कोणत्या चुकीबद्दल बोलत होता? हे आपल्याला नक्की माहीत नसेल तरी करणला मात्र रणबीरचा प्रश्न नेमका समजला.
'ज्या रिलेशनशीपमध्ये राहून तुम्ही परत परत चुका करत असाल... आणि चुकीची जाणीवही तुम्हाला होत नाही, अशा रिलेशनशीपमधून तुम्ही लगेचच बाहेर पडलं पाहिजे... तुला कळलं असेलच मी कशाबद्दल बोलतोय, असं मला वाटतंय' असा सल्ला करणनं रणबीरच्या प्रश्नाला उत्तरादाखल दिला.
रणबीर दीर्घकाळ दीपिका पादूकोण आणि कतरिना कैफ यांच्यासोबत नात्यात होता. कदाचित रणबीर यांच्याबद्दल बोलत असेल, असंही त्याच्या अनेक फॅन्सना वाटतंय. याच कार्यक्रमात रणबीरनं रॅपिड फायर राऊंडमध्ये 'माझ्या गर्लफ्रेंडसाठी एखादा सल्ला?' करणला विचारला.... यावर उत्तर देताना 'रणबीर जगातील सर्वात बेस्ट पती' असेल असंही करणनं जाहीर करून टाकलंय. याबद्दल आपण अगोदरच तुझ्या गर्लफ्रेंडला सल्ला दिल्याचंही करणनं यावेळी म्हटलंय.
पण, सध्या रणबीर अनेकदा आलियासोबत दिसतो... आणि आलिया करणच्याही अगदी जवळ आहे... त्यामुळे कदाचित करणनं हा सल्ला रणबीरच्या गर्लफ्रेंडला अर्थात आलियाला दिला असू शकतो, असंही फॅन्सना वाटतंय.