करण जोहरचे दमदार कमबॅक; 'रॉकी और रानी'ने 2 दिवसात कमावला कोटींचा गल्ला, पण 'हे' आव्हान कायम

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Box Office: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'  या चित्रपटातून दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) तब्बल 7 वर्षांनंतर कमबॅक केले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 30, 2023, 11:08 AM IST
करण जोहरचे दमदार कमबॅक; 'रॉकी और रानी'ने 2 दिवसात कमावला कोटींचा गल्ला, पण 'हे' आव्हान कायम  title=
karan johar Rocky Aur Rani Ki Prem Kahani Day 3 Box Office Collection

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Box Office: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटातून दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) तब्बल 7 वर्षांनंतर कमबॅक केले आहे. पहिल्या दोन दिवसांतच करणच्या चित्रपटाने तगडी कमाई केली आहे. रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा प्रमुख भुमिका असलेला हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. दोनच दिवसांत या चित्रपटाने कोटींच्या घरात कमाई केली आहे. (rocky aur rani ki prem kahani box office collection)

11.10 कोटींचे ओपनिंग कलेक्शन

चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित होण्याच्या दिवशीच अपेक्षापेक्षा कमी प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, शनिवार-रविवारी विकेंड आल्याने चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे. इतकंच नव्हे तर, मागच्या आठवड्यात सोमवारी या चित्रपटासाठी अॅडव्हांस बुकिंगही करण्यात आली होती. पहिल्या दिवशी चित्रपटाने 11.10 कोटींचे ओपनिंग कलेक्शन होते. मात्र, निर्माते दिग्दगर्शकांना 13 ते 15 टक्के कोटींची कमाई अपेक्षित होती. मात्र त्या तुलनेते चित्रपटाची कमाई कमी होती. मात्र, शनिवारी चित्रपटाच्या कमाईत 45%टक्क्यांची वाढ झाली आहे.

बॉक्स ऑफिसवर जादू चालली

रिपोर्ट्सनुसार, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16 कोटीं कमावले आहेत. चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तर, समीकक्षांनीही चित्रपटाला चांगले रिव्ह्यु दिले आहेत. प्रेक्षकांची तारिफ आणि सिनेसमीक्षकांचा रिव्ह्यु यामुळं चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे. 

 45 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता 

रणवीर आलियाच्या चित्रपटाने दोनच दिवसात 27 कोटींहून अधिक कलेक्शन केले आहे. रविवारी चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 'रॉकी और रानी'चा ओपनिंग विकेंड कलेक्शन 45 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.  सोमवारीही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. 

करण जोहरचे पुनरागमन

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटातून तब्बल ७ वर्षांनी करण जोहर पुनरागमन करतोय. याआधी त्याने रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या रॉय यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'ऐ दिल है मुश्कील' चित्रपट दिग्दर्शित केला होता. 'रॉकी और रानी' चित्रपटाचे संपूर्ण बजेट 178 कोटी इतके आहे. त्यामुळं चित्रपटगृहात अधिक काळापर्यंत चित्रपट चालण्याची आशा आहे. मात्र, 11 ऑगस्टपासून एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट रिलीज होणार आहेत. अशावेळी करणच्या चित्रपटाला आपली कमाल दाखवण्यासाठी फक्त दोन आठवडे आहेत. या दोन आठवड्यात आलिया आणि रणबीर काय जादू करतात हे पाहणे मोठ्या उत्सुकतेचे ठरणार आहे.