'ही' आहे करण जोहरच्या जीवनातील महत्वाची व्यक्ती

बॉलिवूड फिल्ममेकर करण जोहर कायम आपल्या सिनेमांमुळे चर्चेत राहिला आहे. 

Updated: Nov 15, 2017, 06:26 PM IST
'ही' आहे करण जोहरच्या जीवनातील महत्वाची व्यक्ती title=

मुंबई : बॉलिवूड फिल्ममेकर करण जोहर कायम आपल्या सिनेमांमुळे चर्चेत राहिला आहे. 

करणच्या सिनेमातील जोडी ही कायम खास राहिली आहे. नुकतीच करणने आपल्या सैराट रिमेकची घोषणा केली आहे. जान्हवी कपूर आणि इशान खत्तर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. असं सगळं असलं तरीही करणची सर्वात जवळची मैत्रिण आहे काजोल. आणि ती कायम त्याची खास मैत्रिण राहणार असल्याचे त्याने सांगितले आहे. 

करणने सांगितले की, काजोल ही त्याची सर्वाधिक जवळची मैत्रिण आहे आणि ती कायम राहणार आहे. आपल्याला माहितच आहे, काजोल आणि करण यांनी एकत्र अनेक काम केली आहेत. करणने काजोल - शाहरूख या जोडीला घेऊन दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांना दिले आहेत. आता तो नव्या जोडीसोबत काम करत असला तरीही काजोल हीच त्याची अगदी जवळची मैत्रिण असणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं. 

करण  जोहरने नुकताच सैराट रिमेक 'धडक' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा सिनेमा ६ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमात नवी कोरी जोडी पाहायला मिळणार आहे.