कार्तिकला नेटकरी म्हणतात, करिना तुझी सासू आहे

करिना साराची दुसरी आई असल्याची आठवण नेटकरी कार्तिकला करून देत आहेत.

Updated: Oct 3, 2019, 01:09 PM IST
कार्तिकला नेटकरी म्हणतात, करिना तुझी सासू आहे

मुंबई : मोठ्या पडद्यावर आपल्या कौशल्याची छाप सोडलेली अभिनेत्री करिना कपूरने छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. सध्या ती 'डान्स इंडिया डान्स' रियालिटी शोमध्ये परिक्षकाची धूरा सांभाळत आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर तिच्या 'व्हाट वुमन व्हान्ट' या चॉट शोचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी करिनाने सुरू केलेल्या या शोच्या दुसऱ्या भागाला सुरूवात झाली.

रेडिओवर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये पहिला पाहुणा म्हणून अभिनेता सैफ अली खान उपस्थित होता. त्यानंतर अनेक कलाकारांनी तिच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली. त्याचप्रमाणे साराचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता कार्तिक आर्यन देखील त्याच्या सासूच्या टॉक शोमध्ये उपस्थित होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Ye ‘Ishq’ haaye... #KareenaKapoorKhan @dotheishqbaby

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

याचदरम्यानचा एक फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्वत:चा आणि करिनाचा एकत्र फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शन मध्ये 'हाय ये इश्क....' असे लिहिले आहे. त्याच्या पोस्ट नंतर नेटकरी त्याला चांगलेच ट्रोल करत आहे.

'करिना तुझी सासू आहे' अशाप्रकारे कमेंट करून, करिना साराची दुसरी आई असल्याची आठवण करून देत आहेत. सारा आणि कार्तिकच्या नात्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या सर्वत्र पसरत आहेत. शिवाय ते दोघे नेहमी एकमेंकासोबत स्पॉट होतात. 

करिना लवकरच अभिनेता अक्षय कुमार सोबत 'गुड न्यूज' चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाची शूटींग देखील पूर्ण झाली आहे. मोठ्या कालावधी नंतर हे दोन कलाकार पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. त्याचप्रमाणे अभिनेता इरफार खान सोबत 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटात भूमिका साकारणार आहे.