करीना कपूरचे खासगी व्हाट्सऍप चॅट लीक, मोठी गोष्ट समोर

ज्यामुळे सध्या होतेय फक्त बेबोची चर्चा....  

Updated: Jan 8, 2022, 08:52 AM IST
करीना कपूरचे खासगी व्हाट्सऍप चॅट लीक, मोठी गोष्ट समोर  title=

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर सध्याच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलिवूडमध्ये अनेक नव्या अभिनेत्रींची एन्ट्री झाली. पण करीनाच्या बोल्डनेसची जादू अद्यापही चाहत्यांच्या मनात आहे. आजही करीनाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे तिची लहान गोष्ट देखील चाहत्यांसाठी फार महत्त्वाची असते. आता देखील करीनाचे खासगी व्हाट्सऍप चॅट लीक झाले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. 

करीना ज्या व्यक्तीसोबत चॅट करत आहे, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिचीच बेस्टफ्रेंड रिया कपूर (Rhea Kapoor) आहे. खुद्द करीनाने हे चॅट सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

व्हाट्सएप चॅटचा फोटो शेअर करत ती म्हणते, 'मला हा संवाद आवडत आहे.....' चॅटची सुरूवात अशा प्रकारे होते.. रिया करीनाला विचारते तुला हॉट चॉकलेट, व्हीप्ड क्रिम पाठवू... यावर करीना उत्तर देते, नाही, मला ते आवडत नाही. 

करीनाने नकार दिल्यानंतर रिया तिला पर्याय देते आणि म्हणते, 'मग हॉट फज सॉस आणि व्हॅनिला आइस्क्रीम? करीनाला ते आवडलं आणि तिने होकार दिला आणि म्हणली की हा चांगला पर्याय आहे... दोघींचे चॅट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.