सारख्याच वयाच्या मुलांसोबत सावत्र आईचं नातं, कितने अजीब रिश्ते हे यहाँ पे

नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नामुळे अनेक अभिनेत्रींना सावत्र आईचा टॅग मिळाला. पाहुयात कोण आहेत या अभिनेत्री.

Updated: May 13, 2022, 02:47 PM IST
सारख्याच वयाच्या मुलांसोबत सावत्र आईचं नातं, कितने अजीब रिश्ते हे यहाँ पे

मुंबईः बॉलीवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांनी प्रेम मिळवण्यासाठी दुसरे लग्न केले, परंतु या दुसऱ्या लग्नामुळे अनेक अभिनेत्रींना सावत्र आईचा टॅग मिळाला. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच सुंदर अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्या बॉलीवूडच्‍या लोकप्रिय सावत्र आई बनल्‍या.

हेलन: 80 च्या दशकातील प्रसिद्ध डान्सर हेलनच्या सौंदर्याची सर्वत्र चर्चा व्हायची, तिची गाणी आजही चित्रपटांमध्ये गाजतात. 1981 मध्ये हेलनने सलमान खानचे वडील सलीम खान यांच्याशी लग्न केले. पण या लग्नामुळे सलमानच्या कुटुंबात काही बिघडले नाही, तर अनेक प्रसंगी सलमान हेलनसोबतही दिसतो.

करीना कपूर: करीना कपूरला बॉलिवूडची सर्वात स्टायलिश सावत्र आई म्हणता येईल. सारा अली खान आणि करीना कपूर दररोज अनेकदा एकत्र दिसतात. सर्वात आश्चर्याची गोष्ट ही की, करीना सारापेक्षा फक्त 13 वर्षांनी मोठी आहे.

शबाना आझमी: बॉलीवूडचे प्रसिद्ध जोडी जावेद अख्तर आणि शबाना आझमी त्यांच्या जबरदस्त केमिस्ट्रीसाठी ओळखले जातात. शबाना आझमी केवळ चांगली पत्नीच नाही तर एक चांगली आई देखील आहे आणि तिचा सावत्र मुलगा फरहान अख्तरसोबत खूप काही शेअर करते.

दिया मिर्झा: दिया मिर्झाने गेल्या वर्षी दुसरे लग्न केले होते आणि या लग्नामुळे ती एका मुलीची सावत्र आई झाली. दियाचा दुसरा नवरा वैभव रेखीला समायरा नावाची मुलगी आहे..दिया आणि समायरा यांच्यातील प्रेमळ नातं नेहमीच पाहायला मिळतं...

मान्यता दत्त: संजय दत्तची तिसरी पत्नी मान्यता दत्त 43 वर्षांची आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मान्यता तिची सावत्र मुलगी म्हणजेच त्रिशालापेक्षा फक्त आठ वर्षांनी मोठी आहे. मात्र, दोघांच्या बाँडिंगमध्ये वयाचे अंतर अजिबात दिसत नाही.