यामुळे शर्मिला टागोरने पाहिला नाही दुसऱ्या नातवाचा चेहरा, करीनाने दिलं उत्तर

कसं आहे करीना आणि तिच्या सासूचं नातं 

Updated: Apr 15, 2021, 05:35 PM IST
यामुळे शर्मिला टागोरने पाहिला नाही दुसऱ्या नातवाचा चेहरा, करीनाने दिलं उत्तर

मुंबई : करीना कपूर (Kareena Kapoor) सध्या आपल्या लहान मुलासोबत थोडा वेळ घा. या परिस्थितीत अभिनेत्री आपल्या बाळाची खूप काळजी घेत आहे. अशावेळी करीनाची सासू म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर देखील नाही आहे. महत्वाची बाब म्हणजे शर्मिला टागोर यांनी अद्याप आपल्या नातवाचा चेहरा देखील पाहिलेला नाही. 

शर्मिला टागोर गेल्या काही दिवसांपासून पैतृक निवास म्हणजे पटौदी पॅलेसमध्ये राहत आहे. हल्लीच एका मुलाखतीत मिळालेल्या माहितीनुसार करीना कपूर खानने त्यांची प्रशंसा केली आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत नाहीत. (करीनाने शेअर केलं बेडरूममधील सीक्रेट, झोपण्यापूर्वी 'या' तीन गोष्टी बेडवर हव्याच) 

आतापर्यंत पाहिला नाही नातवाचा चेहरा 

लेडीज स्टडी ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत शर्मिला यांनी त्यांचे सिनेमे, प्रवास आणि अनेक गोष्टी शेअर केल्या. या मुलाखती दरम्यान एक व्हिडिओ मॅसेजमध्ये करीनाने सांगितलं की,'अजून शर्मिला यांनी आपल्या छोट्या नातवाचा चेहरा देखील पाहिलेला नाही.' पुढे करीना म्हणाली की,'आम्ही सगळे वाट पाहतोय. कधी आपलं कुटुंब एकत्र येईल आणि तुमच्यासोबत काही वेळ घालवू शकतो.' ़

करीनाने केलं सासूचं कौतुक 

यासोबतच करीनाने आपल्या सासूचं म्हणजे शर्मिला टागोर यांचं कौतुक करत आहे. करीना कौतुक करताना म्हटते की,'मी भाग्यशाली आहे. मला या गोष्टीची खूप चांगल्याप्रकारे जाणीव आहे की, तुम्ही खूप दयाळू आहात आणि माझ्यावर खूप प्रेम करता. तुम्ही खूप केअरिंग आहात. तुम्ही कायमच तुमच्या नातवंडांसाठी उभ्या राहिल्या आहात,'