Kareena Kapoor Taimur : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा बकिंघम मर्डर्स हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिनं डिटेक्टिव्हची भूमिका साकारली आहे. दरम्यान, एका मुलाखतीत तिनं सांगितलं की तिला आधीपासून अशी एक भूमिका साकारायची होती. या दरम्यान, तिनं तिच्या मुलांविषयी देखील सांगितलं आहे. त्यावेळी तैमूरला ती जेव्हा टिव्ही आणि फोनपासून दूर राहण्यासाठी सांगते, तेव्हा तो काय प्रतिक्रिया देतो याविषयी करीनानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
करीनानं पिव्हीआर सिनेमाच्या स्पेशल कार्यक्रमात याविषयी सांगितलं आहे. करीना यावेळी म्हणाली की मला आधीपासून डिटेक्टिव्हची भूमिका साकारायची होती आणि आता अखेर मी ती भूमिका साकारली आहे. आता हा विचार करायचा आहे की तिला आणखी काय करायचं आहे. तिला विचारण्यात आलं की तैमूरनं आता तिचा कोणता रिसेंट चित्रपट पाहिला आहे. यावर करीनानं उत्तर दिलं की फेस्टिव्हल दरम्यान, ती त्याला एक चित्रपट दाखवणार आहे कारण चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
करीना याच कार्यक्रमात तैमूर आणि जेहच्या स्क्रीनटाइमवर प्रश्न विचारण्यात आला की ती कसं काय त्यांच्या स्क्रीनटाइमला रेग्युलेट करते? त्यावर करीनानं उत्तर देत सांगितलं की सोमवार ते शुक्रवार स्क्रीन टाईमसाठी नकार असतो. पण मग ते बोलतात की मग तू टिव्ही का पाहते? तू फोनवर काय करतेस? आजकाल जे पालकांना त्यांच्या मुलांकडून जे काही करून घ्यायचं आहे ते त्यांना देखील करावं लागलं. जर आपली इच्छा आहे की त्यांनी लवकर झोपावं तर त्यावेळी आम्ही सुद्धा टिव्ही पाहू शकत नाही किंवा वाचू देखील शकत नाही, ते पण तोपर्यंत जोपर्यंत ते झोपत नाहीत. कारण मला असं वाटतं की ते त्यांच्या डोळ्यासमोर असलेल्या उदाहरणातून हे सगळं शिकतात त्यामुळे आपल्याकडे दुसरा काही पर्याय नसतो. ते आम्हाला फोन वापरताना पाहतील तर ते देखील तेच करतील.
हेही वाचा : VIDEO : आराध्यानं भर कार्यक्रमात पाया पडून घेतला 62 वर्षीय अभिनेत्याचा आशीर्वाद! ऐश्वर्याचं होतंय कौतुक
दरम्यान, करीनानं पुढे ती तैमूरपेक्षा जास्त लोकप्रिय आहे असं जेव्हा तिनं सांगितलं तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया होती याविषयी तिनं सांगितलं आहे. तिनं यावेळी सांगितलं की 'तैमूर आणि जेहला या फेस्टिव्हलविषयी काही माहित नाही, ते दोघे आता खूप लहाण आहेत पण घराच्या बाहेर फोटोग्राफर्सला पाहून त्यांना एक अंदाज येतो आणि त्यावेळी ते विचार करतात की फोटोग्राफर्स तिचा पाठलाग का करत आहेत. तैमूरला वाटतं की तो इतका लोकप्रिय आहे, तर मी त्याला सांगते की तू नाही मी लोकप्रिय आहे. तर तो बोलतो की एक दिवस मी लोकप्रिय होईल असं होऊ शकतं. आता तैमूरचं लक्ष हे चित्रपटांवर नाही तर फुटबॉलकडे आहे.'
QAT
(17.4 ov) 101
|
VS |
SDA
100/7(20 ov)
|
Qatar beat Saudi Arabia by 1 run | ||
Full Scorecard → |
RWA
(19.4 ov) 102
|
VS |
BRN
105/2(17.2 ov)
|
Bahrain beat Rwanda by 8 wickets | ||
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.