Why is she taller: अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor khan) कृती सेनन (Kriti sanon) आणि तब्बू (Tabu) बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या तीन लोकप्रिय अभिनेत्री लवकरचं स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. रिया कपूरने तिघींसोबत 'द क्रू' (The Crew) सिनेमाची घोषणा केली आहे. सिनेमाची घोषणा केल्यानंतर करिना कपूरने इन्स्टाग्रमवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिन्ही टॉप अभिनेत्रींना एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांना आनंद तर झालाचं असेल, पण चाहते हैराण देखील झाले असतील.
व्हिडीओमध्ये करीना कपूरच्या उजव्या बाजूला तब्बू तर डाब्या बाजूला कृती उभी आहे. व्हिडीओमध्ये चकित करणारी गोष्ट म्हणजे तब्बू सर्वात लहान दिसत आहे आणि करीना दोघींपेक्षा उंच दिसत आहे. करीना कपूर, कृती सेनॉन आणि तब्बू यांचं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (arjun kapoor and kriti sanon movie songs)
करीना कपूरच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर करीना क्रितीपेक्षा उंच का दिसत आहे! असा प्रश्न उपस्थित होत आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिलं - 'करिना कशावर तरी उभी राहिली असेल? ती क्रितीपेक्षा उंच नाही. करीनाने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट येत आहेत. (Kareena Kapoor khan social media post)
दरम्यान, पहिल्यांदाच बॉलिवूडच्या या तीन सुंदर अभिनेत्री 'द क्रू' सिनेमासाठी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाची निर्मिती 'वीरे दी वेडिंग'च्या सुपरहिट निर्मात्या जोडी एकता आर कपूर आणि रिया कपूर यांनी केली आहे. (bollywood update)
कशावर आधारित आहे सिनेमा
संघर्ष करणाऱ्या एअरलाइन उद्योगाच्या पार्श्वभूमीवर आधारित 'द क्रू' एक मजेशीर कॉमेडी असेल. सिनेमात तीन महिला स्वतःला सिद्ध करण्यासाठी सर्व काही अतूट प्रयत्न करताना पाहायला मिळतील. परंतु, त्यांच्या नशिबात काही वेगळतं असतं. 'वीरे दी वेडिंग'नंतर चाहत्यांच्या 'द क्रू' (The Crew) चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.