'मी कधीच सैफच्या पत्नीला भेटली नाही' करिनाचं मोठं वक्तव्य

 बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचं आयुष्य फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. 

Updated: Oct 23, 2021, 07:30 PM IST
'मी कधीच सैफच्या पत्नीला भेटली नाही' करिनाचं मोठं वक्तव्य

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचं आयुष्य फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. या अभिनेत्याने दोन लग्न केली. सैफने पहिले लग्न त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्री अमृता सिंगसोबत केले होतं. 1991 मध्ये सैफ आणि अमृता यांनी त्यांच्या वयातील फरक विसरून एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला होता. पण दोघंही हे नातं जास्त काळ टिकवू शकले नाहीत. 2004 मध्ये 13 वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला.

यानंतर करिना कपूर सैफ अली खानच्या आयुष्यात आली. जी अभिनेत्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. सध्या सैफ आणि करीना आनंदी जीवन जगत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का ? की, सैफच्या दोन्ही बायका एकमेकांपासून अंतर ठेवण्यावर विश्वास ठेवतात. एवढंच नाही तर अमृता सिंगला कधीच भेटले नाही. असं खुद्द करीना कपूरने एका मुलाखतीत सांगितलं.

करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण'च्या सीझन 6 मध्ये करीना कपूर अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत पोहोचली होती. या दरम्यान करीना आणि प्रियांकाने त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक मजेदार प्रश्नांची उत्तरे दिली होती. करण सतत दोन्ही अभिनेत्रींना वैयक्तिक प्रश्न विचारताना दिसला. या शोमध्ये करणने करीना कपूरला अमृता सिंगबद्दल विचारलं, त्यानंतर करिनाने खुलासा केला की, ती अमृता सिंगला कधीही भेटली नाही. करिनाच्या या गोष्टीने करण जोहरला आश्चर्याचा धक्का बसला.

या शोमध्ये करणने करीनाला विचारलं की, तू अमृताशीही अंतर राखतेस का? तुम्ही दोघं एकमेकांशी बोलता का? यावर उत्तर देताना करीना म्हणाली, 'नाही, पण मी तिचा खूप आदर करते. आम्ही कधीच भेटलोदेखील नाही.

करिनाच्या या उत्तराने करण आधी आश्चर्यचकित झाला आणि नंतर त्याने करीनाला विचारलं, 'तू कधी भेटली नाहीस का?' या प्रश्नावर अभिनेत्री म्हणाली, 'नाही, मी घटस्फोट घेतल्यानंतर अनेक वर्षांनी सैफला भेटले. त्यावेळी तो पुर्णपणे अविवाहित होता. सैफ अली खानला घटस्फोट दिल्यानंतर अमृता सिंगने अभिनेत्याशी कोणतेही संबंध ठेवले नाहीत. सैफ तिच्या दोन्ही मुलांसह सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांच्या आयुष्यात खूप आनंदी आहे.